मोदींना 25 दिवसांनंतर साक्षात्कार झाला का? कोरोनावेळी थाळ्या वाजवल्या आता रिकामा सिलिंडर वाजवाय
संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी लोकसभेत (Lok Sabha) महत्त्वपूर्ण निवेदन केले. इराण आणि इस्रायल यांच्यात वाढत चाललेल्या तणावाचा आणि त्याच्या जागतिक परिणामांचा आढावा घेत त्यांनी परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली. जागतिक घडामोडी वेगाने बदलत असून, त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणावर होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी संभाव्य जागतिक इंधन संकट, पुरवठा साखळीतील अडथळे आणि एकूणच जागतिक स्थैर्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच, कोरोनाच्या परिस्थितीसारखं आपण तयार राहायला हवं असेही ते म्हणाले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
Sanjay Raut on PM Narendra Modi: मोदींना 25 दिवसांनंतर साक्षात्कार झाला का?
संजय राऊत म्हणाले की, युद्ध सुरू होऊन 25 दिवस झाले आहेत. 25 दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना साक्षात्कार झाला की संसदेत जाऊन सर्वांसमोर आपल्या विचारांची देवाणघेवाण करायला पाहिजे. सर्वांना सोबत घ्यायला हवे. आम्ही इतक्या दिवसांपासून बोलत होतो की, सर्वपक्षीय बैठक घ्या. तुम्ही सर्वांना बोलवा, जे संकट जगावर आलेले आहे ते भारतात येईल. याबाबत आपण सर्वांशी बोला, सर्वांचा सल्ला घ्या. पण, पंतप्रधानांना वाटलं की, जेव्हा परिस्थिती आपल्या हातातून जात आहे, तेव्हा ते संसदेत आले. कोरोनावेळी थाळ्या वाजवल्या आता रिकामा सिलिंडर वाजवायचा का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी : नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हानेही उभी राहिली आहेत. ही आव्हाने आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आणि मानवतावादी आहेत. युद्धग्रस्त आणि युद्धग्रस्त देशांशी भारताचे व्यापक व्यापारी संबंध आहेत. ज्या प्रदेशात हे युद्ध सुरू आहे, तो प्रदेश जगभरातील इतर देशांसोबतच्या आपल्या व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. विशेषतः हा प्रदेश आपल्या कच्च्या तेलाची आणि वायूची मोठी गरज भागवतो. सरकार संवेदनशील, दक्ष असून सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्चे तेल, गॅस आणि खते यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात मिळतात. युद्धानंतर, या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक अधिकाधिक आव्हानात्मक झाली आहे. असे असूनही, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर लक्षणीय परिणाम होणार नाही, हे सुनिश्चित करण्यावर आमच्या सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक आहे. हे संकट लवकरात लवकर संपवण्यासाठी सर्वांनी तोडगा काढावा असे आवाहन संपूर्ण जग करत आहे. कोरोनाच्या परिस्थितीसारखं आपण तयार राहायला हवं, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.