‘मी राजीनामा देणार नाही’ म्हणणे हा ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाचा भाग! – संजय राऊत

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. आम्हाला कटकारस्थान करून हरवण्यात आले आहे, असे म्हणत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आपण ममता बॅनर्जी यांच्या मताशी सहमत असून ‘मी राजीनामा देणार नाही’ म्हणणे हा त्यांच्या आंदोलनाचा भाग असल्याचे राऊत म्हणाले. बुधवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी हे विधान केले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, इंडिया आघाडी ममता बॅनर्जी यांच्यासोबत आहे. इंडिया आघाडीच्या देशातील प्रमुख नेत्यांनी या लढाईमध्ये आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत ही भूमिका घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना फोन करून पाठिंबा दिला.

ममता बॅनर्जी म्हणतात हा पराभव नाही. त्यांच्या या मताशी आम्ही सहमत आहोत. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी इराण-इस्रायल युद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण केली. सैन्य, दहशत, आर्थिक दहशतवाद, अफवा… केंद्रातील संपूर्ण सरकार कोलकात्यात येऊन बसले होते. मतदार याद्यांमधून लाखो लोकांची नावे वगळण्यात आली. ममता बॅनर्जी यांचा यावेळी पराभव करून दाखवायचा या एकाच द्वेषाने ही निवडणूक लढवून त्यांना सत्तेत येण्यापासून रोखले, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

ममता बॅनर्जी यांनी असेही म्हटले की मी राजीनामा देणार नाही. कारण मी विजयी झाले आहे. मी राजीनामा देणार नाही, असे म्हणणे हा ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाचा भाग आहे. सरकार विरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाही विरोधी कृत्यांची मालिका पश्चिम बंगालमध्ये झाली. त्या विरोधात मी राजीनामा देणार नाही ही भूमिका त्यांच्या आंदोलनाचा भाग आहे. त्या आंदोलनाला काय दिशा मिळते हे पहावे लागेल, असेही राऊत म्हणाले.

ममतांनी राजीनामा न दिल्यास पुढे काय? कायदेतज्ञांनी सांगितले पर्याय

काल ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी निवडणूक आयोगाला व्हीलन म्हटले. 100 हून अधिक जागा चोरल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदार याद्यांमधून लाखो नावं वगळली हे सत्य आहे. ममता बॅनर्जी या सत्तेत असो किंवा विरोधात… त्या कायम आंदोलक राहिलेल्या आहेत. मुख्यमंत्री असतानाही त्या ईडी, केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या, असेही संजय राऊत म्हणाले.

राजीनामा देत नसतील तर हकला त्यांना! ममता बॅनर्जींच्या भूमिकेसंदर्भात ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांचे विधान, वाद चिघळण्याची शक्यता

Comments are closed.