Sanjay raut criticise BJP Shivsena eknath shinde operation tiger Shivsena Uddhav Thackeray group


राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ऑपरेशन टारगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा सातत्याने केला जात आहे.

मुंबई : राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ऑपरेशन टारगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा सातत्याने केला जात आहे. अशात आता या दाव्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. (Sanjay raut criticise BJP Shivsena eknath shinde operation tiger Shivsena Uddhav Thackeray group)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “ऑपरेशन टायर, ऑपरेशन कमळ होईल. पण आधीच ऑपरेशन रेडा झालेलं आहे. अशा अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. आमचे सर्व खासदार उपस्थित होते. ते सात आकडा चुकीचा सांगत आहेत. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा सांगायला हवा. ते कोणत्या गुंगीत आहेत, हे त्यांनी समजून घ्यायला हवं. त्यांनी त्यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण केली पाहिजे. आता 12.30 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये जे काही घोटाळा झाले, त्याबद्दल पुराव्यानिशी ते बोलणार आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

“ते कसलं ऑपरेशन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतात. त्यांचा रोज अपमान होत आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अॅपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल. पोटात अॅपेंडिक्सची एक गाठ असते. ती कधीही कापली जाऊ शकते. आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अॅपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करत आहेत, त्याची तुम्ही काळजी घ्या”, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.


हेही वाचा – Sanjay Raut : बेड्या घालून घुसकोरांना परत पाठवत अमेरिकेनं भारताची इज्जत दाखवून दिली – संजय राऊत



Source link

Comments are closed.