Sanjay raut criticises devendra fadnavis and bjp over beed parbhani walmik karad issue
एरवी शहरी नक्षलवादाची चिंता करणाऱ्यांना आता याच प्रकरणातील राजकीय नक्षलवाद अस्वस्थ करत नाही काय, असा सवाल शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून त्यांनी ही टीका केली आहे.
मुंबई : राज्यात सध्या बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारहाणीचे प्रकरण असो, ही दोन्ही प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. यावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली, आरोपींना शिक्षा ठोठावण्यावरून दबावही आणण्यात आला. एरवी शहरी नक्षलवादाची चिंता करणाऱ्यांना आता याच प्रकरणातील राजकीय नक्षलवाद अस्वस्थ करत नाही काय, असा सवाल शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून त्यांनी ही टीका केली आहे. (sanjay raut criticises devendra fadnavis and bjp over beed parbhani walmik karad issue)
परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडमधील सरपंच देशमुख या दोन खुनांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. सरपंच देशमुख यांच्या खुनाचा संबंध थेट महाराष्ट्राच्या एका मंत्र्याशी जोडला जातो आहे आणि धनंजय मुंडे हे आजही मंत्रिमंडळात सत्ता उपभोगीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने घ्यावे असे हे बीड जिल्ह्यातील प्रकरण आहे. गडचिरोलीचा नक्षलवाद आणि अर्बन नक्षलवादाची चिंता करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना बीडचा राजकीय नक्षलवाद अस्वस्थ करीत नाही काय?
– Advertisement –
हेही वाचा – मराठी on Thakceray : एवढ्या वेगाने रंग बदलणारे पाहिले नाहीत…उपमुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात
सरपंच देशमुख यांच्या खुनाचे शिंतोडे त्यांच्या एका मंत्र्यावर पडूनही ते मंत्री सरकारात आहेत. नैतिकतेच्या कोणत्या संकेतात हे बसते? धनंजय मुंडे यांना चौकशी होईपर्यंत मंत्रिमंडळाबाहेर ठेवले तर महाराष्ट्रावर आभाळ कोसळणार आहे काय? देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दोन महिन्यांत जे कमावले ते सरपंच देशमुख व धनंजय मुंडे प्रकरणात गमावले. फडणवीस म्हणतात, मी या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. याचा अर्थ धनंजय मुंडे यांना वगळून मी सगळ्यांचा बंदोबस्त करीन, असा आहे का, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
– Advertisement –
फडणवीस असे का वागतात याचे उत्तर जातीय राजकारणात आहे. मुंडे यांच्यावर कठोर कारवाई केली तर ते ज्या समाजातून येतात, तो वंजारी समाज भाजपपासून दुरावला जाईल. त्यामुळे देशमुख हत्येचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर उडाले ते मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व ते करतात आणि या सगळ्या प्रश्नावर अजित पवार मूग गिळून बसले आहेत. कायद्याचे बडगे, चौकशांचे ससेमिरे फक्त सामान्य माणसे आणि भाजपच्या राजकीय विरोधकांसाठी. बाकी सगळ्यांना खून, हत्या, खंडणीच्या गुन्ह्यातही माफी आहे. हा कसला कायदा! हे कसले राज्य, अशी विचारणा देखील राऊतांनी केली आहे.
हेही वाचा – Congress : ही बेगडी निष्ठा शंकेच्या घेऱ्यातच…संविधान प्रतीवरून कॉंग्रेसची भाजपवर टीका
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही खुलासा करणार आहेत काय? धनंजय मुंडे हे परळीत दहशतवादाच्या जोरावर निवडून आले. तसे सबळ पुरावे आहेत. निवडणूक आयोगाने सत्य मानले तर मुंडे यांची निवडणूक रद्द होऊ शकेल, पण हे सर्व करायचे कोणी? नैतिकता हा विषयच आता निकालात निघाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज कोणीच कोणाचे राहिलेले नाही. खरे पक्ष उरले नाहीत, त्यामुळे विचारधारा नाही. सर्व युक्त्या, भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून निवडून येणारे तसेच निवडून आणणारे असेच लोक राजकारणात यापुढे टिकतील आणि त्यांना भ्रष्टाचार, खंडणी, खुनासारखे गुन्हे माफ आहेत! ही सध्याच्या भाजपची नियत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Comments are closed.