Sanjay Raut criticized Eknath Shinde statement citing the example of Aurangzeb
आम्ही तीन वर्षांपूर्वी मोठी क्रांती केली होती, ते मोठे राजकीय कथानक होते, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले होते. त्यांच्या या विधानावर खासदार संजय राऊतांनी टीकास्त्र डागले आहे.
मुंबई : आम्ही तीन वर्षांपूर्वी मोठी राजकीय क्रांती केली. आम्ही केलेली ती शांतीत क्रांती होती. यापेक्षा मोठे राजकीय कथानक होऊ शकेल का? यावर नाटक होईल, चित्रपट होईल, साहित्यिकांना आमच्याकडे बघावे लागेल, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पण त्यांच्या या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. औरंगजेबासारखेच एकनाथ शिंदे यांच्याकडेही भरपूर पैसे आहेत, असा टोला राऊतांनी लगावला आहे. खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. 28 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. (Sanjay Raut criticized मराठी statement citing the example of Aurangzeb)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावर खासदार संजय राऊतांनी टीका करत म्हटेल की, एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक आहेत. ते फार मोठे लेखक, कवी, संत आणि महात्मे आहेत. पण अजून काही त्यांना पदवी द्यायची असेल तर ती आम्ही देऊ. असे आहे की या सर्व पदव्या या एकनाथ शिंदे विकत घेऊ शकतात. आमदार, खासदार जसे विकत घेतले जातात, तसे कवी, साहित्यिक, लेखक या पदव्या त्यांना हव्या असतील तर ते विकत घेऊ शकतात आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार, साहित्य अकादमीचा पुरस्कार, इतकेच काय तर त्यांच्याकडे मोठे ज्ञान असल्याने त्यांना अमित शहा ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा देऊ शकतात, अजून त्यांना काय हवे, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
हेही वाचा… Sanjay Raut : आपले गृहराज्यमंत्री दिव्यच…, योगेश कदमांच्या विधानावर राऊत संतापले
तसेच, एकनाथ शिंदे यांचा मराठी भाषा, मराठी साहित्य, स्वाभीमान, इतिहास याच्याशी काही संबंध नाही. पण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. असा पैसा अफजल खान आणि औरंगजेब यांच्याकडेही होता. निजामाकडेही होता. तो पैसा यांच्याकडेही आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या चाहत्यांकडे पैसे नव्हते. म्हणून त्यांना स्वराज्यासाठी सुरतवर हल्ला करावा लागला. कारण सुरत, गुजरातमध्ये इतका पैसा होता की ते मोघलांना आणि ईस्ट इंडिया कंपनीला या देशाच्या विरोधात पैसे देत होते. म्हणून छत्रपतींना सुरत लुटावी लागली. पण त्याच सुरतमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक जाऊन थांबली होती. त्यावेळी त्यांच्याकडे फार मोठे साहित्य होते, असे टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी डागले आहे.
Comments are closed.