डुप्लिकेट शिवसेनेची मतं फुटण्याची भीती आहे का? फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये; संजय रा
देवेंद्र फड्नाविसवरील संजय रौत: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयासाठी भाजपकडून तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांशी थेट संवाद साधण्याची मोहिम सुरू केली आहे. विशेष म्हणजे, याच अनुषंगाने फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे संयुक्त उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला. त्या ठिकाणी अर्ज दाखल करताना शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी उपस्थित होतो. एक दिवस आधी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सुदर्शन यांचे स्वागत करणाऱ्या आणि पाठिंबा व्यक्त करणाऱ्या विरोधी पक्षांची बैठक झाली त्यात मी आणि शरद पवार उपस्थित होतो. मी जी भाषण केलं त्यात मी स्पष्ट सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे.
पक्ष फोडणाऱ्या लोकांकडे आम्ही शिष्टाचार म्हणून पाहतो
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला किंवा राजनाथ सिंह हे राष्ट्रीय पातळीवर बोलत आहेत. मात्र, आमच्या सारख्या लोकांनी हुकूमशाही विरुद्ध लढण्याची ठाम भूमिका घेतलेली आहे. संविधान पायदळी तुडवून आमदार फोडणे, पक्ष फोडणे, दहशत निर्माण करणे अशा लोकांविरोधात आमच्यासारख्या लोकांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अशा फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो, असे त्यांनी म्हटले.
डुप्लिकेट शिवसेनेची मतं फुटण्याची भीती आहे का?
संजय राऊत पुढे म्हणाले की, मला आश्चर्य वाटतं बाळासाहेब ठाकरे यांना पक्ष तुम्ही फोडला. शरद पवारांचा पक्ष फोडला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आमदार, खासदार पन्नास-पन्नास कोटीला विकत घेतले. तुम्ही त्याच पक्षाकडे मत मागत आहात. आपल्याकडे बहुमत आहे असे आपण म्हणतात तर तुम्हाला अशा प्रकारे मत मागण्याची गरज नाही. तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का की तुमचे मतं फुटतील. डुप्लिकेट शिवसेनेची मतं फुटतील ही भीती आहे का? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
निवडणुकीत अशा प्रकारच्या चर्चा होत असतात
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सहज नाही. आज मोदींकडे कागदावर बहुमत दिसत असले तरी आंध्रचे उमेदवार असल्यामुळे तेलंगणा आणि आंध्रमध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीने आम्ही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना आणि आम्ही एनडीएमध्ये असताना देखील मराठी भूमीकन्या म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. आंध्र आणि तेलंगणाचे खासदार अशा प्रकारची काही भूमिका घेतील का? अशी भीती या लोकांना वाटत आहे. तसेच राहुल गांधींनी जे वातावरण देशात निर्माण केलेले आहे. त्यानंतर क्रॉस वोटिंग व्हायची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आणि राजनाथ सिंह यांच्यावर जबाबदारी असेल त्यांनी तो शिष्टाचार म्हणून उद्धव ठाकरेंची चर्चा केली असेल. त्यात वावगं काहीही नाही. निवडणुकीत अशा प्रकारच्या चर्चा होत असतात, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये
महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातील माणूस हा उपराष्ट्रपती होतोय, त्यामुळे त्यांना मतदान करायला हवं. माझं महाराष्ट्रातील इतर पक्षांना देखील आवाहन आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्हीही गटांनी देखील सी. पी. राधाकृष्णन यांना समर्थन द्यायला हवं, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्यगिरी शिकवू नये. ते महाराष्ट्राचे मतदार आहेत. मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे होतं. कोणताही राज्यपाल हा राज्याचा प्रथम नागरिक असतो हे आम्हाला माहिती आहे. आम्ही घटनेचे पालन करतो आणि ते घटना पायदळी तुडवता. ते या राज्याचे मतदार आहेत, नागरिक नाहीत. ते यापुढे या राज्याचे मतदार नसतील ते दिल्लीचे मतदार असतील. त्यांचं मूळ हे तामिळनाडूमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही आम्हाला काही सांगू नये. तुम्ही एखादा मराठी माणूस उमेदवार म्हणून दिला असता तर त्यावर चर्चा झाली होऊ शकली असती. पण आता नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला.
https://www.youtube.com/watch?v=aendwbtyyoi
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.