देशाचा निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारीच, संजय राऊत यांचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या माणसाविरुद्ध केलेलं महाभियोग प्रस्ताव बहुमत असताना 193 सह्या असताना उपराष्ट्रपतींनी फेटाळून लावलं. त्या निवडणुक आयोगाकडून आम्ही कोणती अपेक्षा करणार? हा निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग हा भाजपचा हस्तक आहे. अजून ज्ञानेश कुमार नावाचा सद्गृहस्थ तिथे बसवला आहे. त्यालाच हे लोकं डिलिमिटेशन कमिशनर करणार होते. यांच्या घरावर जणू भाजपचा झेंडाच फडकतोय, आता केवळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लावायचा बाकी उरला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पाच राज्यांमधील निवडणुकांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारींवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार, असा सवाल विचारला असता राऊत यांनी आयोगावर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले. देशाचा निवडणुक आयोग हा भाजपचा निवडणुक आयोग झालेला आहे. सध्याचा निवडणूक आयोग हा लोकशाही आणि संविधानाला धाब्यावर बसवून केवळ सत्ताधारी पक्षाचा ‘हस्तक’ म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
Comments are closed.