हिरानंदानी बिल्डरकडून रहिवाशांची मोठ्या प्रमाणात फसवणूक, बीएमसीचा थेट हात! संजय राऊत यांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी
हिरानंदानी गार्डन्स, पवई येथील सेक्टर IX मधील पाच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व रहिवाशांनी माझ्याकडे येऊन आपली व्यथा मांडली. त्यांनी सादर केलेली कागदपत्रे, उपमुख्य अभियंता (बिल्डिंग प्रपोजल, पूर्व उपनगर) यांना दिलेले तपशीलवार पत्र आणि १७ एप्रिल २०२५ च्या संयुक्त साइट तपासणीचे निष्कर्ष मी काळजीपूर्वक पाहिले. हे प्रकरण केवळ तांत्रिक त्रुटीचे नाही. इथे रहिवाशांची योजनाबद्ध गुन्हेगारी स्वरुपाची फसवणूक आहे आणि BMC च्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेला अन्याय आहे, असे स्पष्ट मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणी संजय राऊत यांनी प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.
हिरानंदानी @N_हिरानंदानी बिल्डरने रहिवाशांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे आणि याफसवणूकीत बीएमसीचा थेट हात आहे. रहिवाशांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. प्रशासनाने ताबडतोब हस्तक्षेप करून रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/tniLaI8W2q— संजय राऊत (@rautsanjay61) 1 सप्टेंबर 2026
आपल्या पत्रात ते लिहितात की, ‘मंजूर आखाड्यातील Recreation Ground रहिवाशांना न देता, खोटी गणना दाखवून, जुन्या व नवीन नियमावलीतील सोयीस्कर तरतुदी एकत्र करुन संबंधित बिल्डरला Building (Adonia II) ची मंजुरी देण्यात आली आहे. हा जनतेचा विश्वासघात आहे’. संजय राऊत यांनी या पत्रातून केलेल्या आरोपामुळे महापालिकेतील संबंधित अधिकऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या पत्रानंतर प्रशासन संबंधित बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
Comments are closed.