Sanjay Raut has alleged that politics is being done to make Amit Shah happy PPK


रद पवारांच्या राष्ट्रवादीवर आता पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाचे वारे घोंगावू लागले आहेत. बाप लेकींना सोडून राष्ट्रवादीत या, असा प्रस्ताव सुनिल तटकरे यांनी दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर आता पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाचे वारे घोंगावू लागले आहेत. बाप लेकींना सोडून राष्ट्रवादीत या, असा प्रस्ताव सुनील तटकरे यांनी दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊतांनी शहांचा उल्लेख मोगॅम्बो असा करत, मोगॅम्बोला खूश करण्यासाठी फोडाफोडी सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. पण ‘बाप आणि लेकीला सोडा, आमच्यासोबत या’ ही भाषा वापरणं अतिशय अमानुष आहे, असेही राऊतांनी म्हटले आहे. (Sanjay Raut has alleged that politics is being done to make Amit Shah happy)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 09 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे, तेवढीच ही भाषा क्रूर आणि निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्याने तुम्हाला या स्तरावर नेले, पण तुम्ही बाप-लेकीला सोडा, ही भाषा वापरण्यापर्यंत, या स्तरापर्यंत येता हे गंभीर आहे. केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी तुम्ही ही पातळी गाठता, ते क्रूर आहे. अमित शहांना खुश करण्यासाठी म्हणजेच मोगॅम्बोला खुश करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे, अशी टीका यावेळी राऊतांनी केली.

– Advertisement –

हेही वाचा… Sanjay Raut : दिल्ली विधानसभेसाठी ठाकरे गटाचा पाठिंबा कोणाला? राऊतांनी स्पष्टच सांगितले

तर, लोकसभा निवडणुकीत, ज्या कठीण परिस्थितीत शरद पवार यांनी कष्ट करून 8 खासदार निवडून आणले, त्यातले काही लोक जर सोडून जात असतील तर ते रावणाचे वंशज आहेत, असा हल्लाबोलही खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच, उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल, कोणी पक्षातून फुटत असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्घृण-अमानुष असतील, असा टोलाही यावेळी खासदार राऊतांनी लगावला.

– Advertisement –

आरएसएसचं बुथ मॅनेजमेंट घोटाळ्याचे…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपाला मिळालेल्या भरघोस यशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले आहे. ज्याबाबत आता खासदार संजय राऊत म्हणाले की, आरएसएसने बुथ मॅनेजमेंट चांगले केले. मात्र प्रत्येक बुथवर गैरप्रकार झाला, प्रत्येक बुथवर मतं वाढली आहेत. त्यामुळेच झालेले मतदान आणि प्रत्यक्ष झालेले मतदान यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे मला आरएसएसच्या बुथ मॅनेजमेंटचं मला कौतुक वाटत नाही, असे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.



Source link

Comments are closed.