संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांच्या सोबत शिवसेना नेते, आमदार अनिल परब देखील होते.

या भेटीआधी संज राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ”या क्षणी माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले आहेत. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, पुणे, नाशिक आम्ही एकत्र लढत आहोत. इतर महापालिकेत स्थानिक नेते निर्णय घेतील”, असे सांगितले होते.

Comments are closed.