भाजप धार्जिणे भ्रष्ट मनोवृत्तीचे लोकं लोकसेवा आयोगावर नेमले, राज्यपालांनी हा आयोगच बरखास्त करावा! – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भारतीय जनता पक्षाला धार्जिणे असलेले भ्रष्ट मनोवृत्तीचे लोक महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्यपालांनी लोकसेवा आयोग बरखास्त केला पाहिजे. लोकसेवा आयोग ही संविधानिक संस्था असून ती राज्यपालांच्या अखत्यारीत येते, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत रविवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) व विविध शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो परीक्षार्थींच्या न्याय्य मागण्यांसाठी पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी अलका टॉकीज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पाठिंबा दिला आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊत यांनी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत जे मत मांडलेले आहे ते शंभर टक्के सत्य आहे, असे म्हटले.

विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास उडालाय… MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चाला राहुल गांधींचा पाठिंबा, सरकारवर ओढले ताशेरे

Comments are closed.