या पुढे ED आपल्या दारात येणार नाही! मी शेवटचा व्यक्ती होतो ज्यांच्याशी त्यांनी पंगा घेतला; संजय राऊत यांचं खणखणीत भाषण

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी खणखणीत भाषण करत तुरुंगातील अनुभव व्यक्त केले. यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही. मी शेवटचा माणूस होतो, ज्याच्या नादाला ईडी लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, अशा रोखठोक शब्दांत संजय राऊत यांनी ईडीचा समाचार घेतला.
जावेद अख्तर, साकेत गोखले, शरद तांदळे यांच्या हिंमतीचे कौतुक करताना संजय राऊत यांनी ईडीच्या चक्रव्यूहावर सडकून टीका केली. साकेत आणि मी आमच्या दोघांमध्ये साम्य असं आहे की, मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. ते ही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो. आमचे शरद तांदळे.. त्यांनी खरोखरच हिंमतीचे काम केलं आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी. मी शेवटचा माणूस होतो, ज्याच्या नादाला ईडी लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, असे संजय राऊत म्हणाले.
भाषणामधून ईडीचा समाचार घेतानाच त्यांना ज्येष्ठ पटकथाकार जावेद अख्तर यांचे भरभरुन कौतुक केले. ते म्हणाले, जावेद अख्तर साहेब केवळ पटकथाकार, लेखक नाहीत. जिथे जिथे देशात अन्याय घडेल, तिथे जावेद साहेब सातत्याने आपला आवाज उठवत असतात. जावेद साहेबांचं इथं असणं हे अत्यंत प्रेरणादायी आहे. माननीय शरद पवार साहेब, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाहीत. ते ही पडद्यामागून आमच्यासाठी अशा अनेक लढाया लढत राहिले आणि समोरूनही लढत असतात. माननीय उद्धव साहेब माझे सर्वोच्च नेते, मित्र आणि सदैव माझ्या पाठिशी ते उभे राहिले. आणि खास पाहुणा जो आपण कलकत्त्यातून बोलावला आहे. त्यांचं नाव गोखले आहे. आता साकेत गोखले कोलकात्त्यात कुठे गेले? ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलावून खासदार केलं. का? महाराष्ट्रातून एक लढवय्या त्यांना हवा होता कोलकात्त्यात. आमच्या दोघांमध्ये साम्य असं आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. ते ही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो. साकेत गोखले हे काही काळापासून एक तरुण राजकारणी, उत्तम पत्रकार, उत्तम लेखक आहेत ते. ते मूळचे मुंबईचे आहेत.
Comments are closed.