भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडणार,
भारत-पाकिस्तान सामन्यावरील संजय राऊत: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) आठवणी ताज्या असतानाच आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना (India vs pakistan match) होणार आहे. आता या सामन्याच्या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) मोठा निर्णय घेतलाय. ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर या सामन्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि त्यात निर्णय घेतला आहे. अबुधाबीला भारत-पाक सामना खेळवला जात आहे. हे लोकभावनेविरुद्ध आहे. अजूनही 26 निरपराध लोक पहलगाम येथे मारले गेले, त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहतोय. ऑपरेशन सिंदूर सुरु आहे, असे म्हणताय. पाकिस्तानचे कंबरडे मोडू असे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले. खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा असे देखील म्हणाले. आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे? भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं याबद्दल म्हणणं काय आहे ते त्यांनी सांगावं, असे आव्हान त्यांनी दिले.
‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडणार
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेची महिला आघाडी 14 तारखेला रस्त्यावर उतरणार आहे. ‘माझं कुंकू-माझा देश’ असा आंदोलन केलं जाईल. “सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै’ असे आंदोलन असणार आहे. मोदींना महिला सिंदूर पाठवतील. ते अभियान सुद्धा आम्ही राबवणार आहोत. या मॅचचा निषेध आमचा पक्ष करेल. हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. भाजपच्या नेत्यांची पोरं अबुधाबीला मॅच बघायला जातील. जय शाह तर क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत. अमित शाह आम्हाला राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो, असे म्हणतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलेलो नाही.
फेलगाव हल्ल्यात सिंदूर पुसून टाकलेल्या 26 माता व बहिणींचा आक्रोश अद्याप थांबला नाही. दहशतवादी पाकिस्तानचा कणा तोडण्यासाठी सिंदूर सुरू झाला.
– संजय राऊत (@राउत्सनजे 61) 11 सप्टेंबर, 2025
शिवसेना हे सहन करू शकत नाही
बाळासाहेब ठाकरे यांनी भारत-पाक सामन्याला कायम विरोध केला आहे. जावेद मियाँदाद घरी आला तेव्हा त्याला बाळासाहेब ठाकरेंनी ठणकावून सांगितले होते की चहा प्यायचा आणि निघून जायचे. सामन्याची वकालत इथे करायचे नाही. एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येतात? तुम्हाला लाजा वाटत नाही का? हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे. अरे तुम्ही तुमचे तोंड तरी उघडा. विरोध तरी करा. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना, असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ऑपरेशन सिंदूर संपले नाही. महिलांचा आक्रोश थांबला नाही. आजही सर्व ठिकाणी वेदना आहेत आणि तुम्ही पाकिस्तान सोबत सामना खेळत आहात. शिवसेना हे सहन करू शकत नाही. आमच्या महिला रस्त्यावर उतरणार, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिलाय.
https://www.youtube.com/watch?v=4eo_szo4zu
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.