मोदी-शहा राहुल गांधींना घाबरलेले आहेत, पुण्यातील कार्यक्रम उधळण्याची भाषा म्हणजे दहशतवाद; संजय राऊत यांचा घणाघात
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा भाजप आणि एबीव्हीपीकडून केली जात आहे. याचा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. मोदी-शहा राहुल गांधी यांना घाबरलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये भीती आहे. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी बोलणार म्हणून त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा कुणी करत असेल तो दहशतवाद आहे. अशा प्रकाची भूमिका घेणाऱ्यावर पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई केली पाहिजे, असे संजय राऊत पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.
Comments are closed.