अद्वैय हिरे मूळ फिर्यादी, त्यांनी खोटी माहिती दिली; दादा भुसे प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अद्वैय हिरे हे मूळ फिर्यादी असून त्यांनी खोटी माहिती दिली, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दादा भुसे प्रकरणावर दिली. गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणात ते शनिवारी मालेगाव कोर्टात हजर राहिले. यावेळी दादा भुसे यांनीही चुकीच्या माहितीच्या आधारे संजय राऊत यांनी आरोप केले असे म्हणत हा खटला मागे घेतला. त्यानंतर दोघांनी कोर्टाबाहेर माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, ज्यांच्यामुळे हा विषय निर्माण झाला ते आमच्या पक्षात राहिलेले नाही. तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत. गिरणा सहकारी साखर कारखानाबाबतचे वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केले होते, तो आधार ज्यांनी निर्माण केला त्यांनी त्या संदर्भात पाहावे. चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केल्याचे मला नंतर लक्षात आले. ज्यांनी हे समोर आणले ते आता स्वत:च दूर गेलेले आहेत. त्यामुळे मी या विषयावर दादा भुसे यांच्याशी का भांडू. ज्यांना भांडायचे असेल ते भांडतील.

अद्वैय हिरे यांनी मला माहिती दिली होती आणि आता ते सत्ता पक्षात गेले आहेत. दादा भुसे स्वत: मंत्री असून आम्हाला हा विषय संपवायचा आहे. जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा हा कारखाना अद्याप उभा का राहिला नाही एवढीच माझी भूमिका होती. परंतु त्या संदर्भात मी नंतर माहिती घेतली. दादा भुसे यांच्याकडूनही माहिती आली. आता या विषयावर फार चर्चा करू नये, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.