Sanjay Raut On Eknath Shinde Shiv Sena BJP Amit Shah News In Marathi
एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपचा आहे. अमित शहा यांची शिवसेना एकनाथ शिंदे चालवत आहेत, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
नाशिक : एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपचा आहे. अमित शहा यांची शिवसेना एकनाथ शिंदे चालवत आहेत, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. (Sanjay Raut On मराठी Shiv Sena BJP Amit Shah News In Marathi)
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“एकनाथ शिंदे यांचा मुळात पक्षचं नाही आहे. स्वपक्षाची भूमिका सोडून द्या, कारण त्यांचा पक्ष हा भाजपचा पक्ष आहे. त्यांचा पक्ष भाजपने निर्माण केलेला पक्ष आहे. जरी या पक्षाला अमित शहा यांनी शिवसेना असं नाव दिलं असलं तरी, तो अमित शहा यांचा पक्ष आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल, हे सांगू शकत नाही”, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
“एकनाथ शिंदे यांचा प्रश्न भविष्यात एकसंघ राहणं कठीण वाटत आहे. हा पक्ष अमित शहा यांचा आहे, तो सध्या एकनाथ शिंदे चालवत आहेत. तो पक्ष एकसंघ राहील असं वाटत नाहीत. कारण पक्षातील 20 पेक्षा जास्त आमदार हे देवेंद्र फडणवीसांचे म्हणजे भाजपचे आमदार आहेत. अजित पवारांच्या पक्षातही 17 ते 18 आमदार हे भाजपचे आहेत. भाजपने अजित पवारांनी आमदार निवडून दिले आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.
“मला या दोन्ही गटातील लोकांचं काहीच खरं वाटत नाही. या दोन्ही गटातील लोकं भाजपात विलीन होतील. उरलेले इकडे-तिकडे पळून जातील. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही खरीच शिवसेना आहे. आम्हीही एकाच ठिकाणी खंभीर उभे आहोत”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
Comments are closed.