फडणवीसांना हवे तेच गणेश नाईक बोलत आहेत! भ्रष्टाचाऱ्यांचा टांगा पलटी करायला हायकमांडची गरज लागत नाही!! – संजय राऊत

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नगरविकास विभागाचे अक्षरशः वाभाडे काढले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारमध्ये असलेला माणूस बेधडकपणे सत्य सांगतोय. दोन महानगरपालिकेत कसा भ्रष्टाचार सुरू आहे हे एक मंत्री उघडपणे बोलतोय. फडणवीसांना हवे तेच गणेश नाईक बोलत आहेत, असे खासदार संजय राऊत सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
शिवतीर्थावरील सभा गेमचेंजर, ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, ठाकरेंचा महाराष्ट्राला संदेश! – संजय राऊत

Comments are closed.