Sanjay Raut On Narendra Modi Delhi Assembly Election 2025 Results Live Updates


दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. यावेळी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Sanjay Raut On Narendra Modi मुंबई : राजकारणात असताना एक इच्छा असते. तशी त्यांची (नरेंद्र मोदी) शेवटची इच्छा असेल की, मी असताना दिल्लीत जिंकलं पाहिजे. त्यामुळे कोणत्याही थराला जाऊन दिल्लीत विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. (Sanjay Raut On Narendra Modi Delhi Assembly Election 2025 Results Live Updates)

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. यावेळी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यानुसार, “पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वर्षांपासून दिल्लीत आहेत, पण ते दिल्ली जिंकू शकले नाहीत. त्यामुळे राजकारणात असताना एक इच्छा असते. तशी त्यांची शेवटची इच्छा असेल की, मी असताना दिल्लीत जिंकलं पाहिजे. त्यामुळे कोणत्याही थराला जाऊन दिल्लीत विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असं म्हणत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला.

“दिल्लीत राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि मी एक पत्रकार परिषद घेतली. सरकार आणि निवडणूक आयोगाचं कसं साटलोट आहे, हे आम्ही या पत्रकार परिषदेतून मांडलं. मतदार यादीत कशाप्रकारे घोटाळा होतोय हे आम्ही सांगितलं. तसेच, महाराष्ट्र पॅटर्नचा दिल्लीत वापर केला गेला आहे. महाराष्ट्र पॅटर्नप्रमाणेच दिल्लीत काम केलं. त्यानुसारच दिल्लीत निवडणुका लढवल्या. निवडणूक आयोग यावेळी डोळे बंद करून बसला होता”, असेही संजय राऊत म्हणाले.

“महाराष्ट्रात 39 लाख मत लोकसभा आणि विधासभेच्या मधल्या कालावधीतील पाच महिन्यात वाढले. याबाबत आम्ही प्रश्न विचारले. त्यानंतर या 39 लाख मतांचं काय होणार असं विचारण्यात आलं. त्यावर मी ही मतं आता बिहारमध्ये शिफ्ट होतील. त्यातील काही दिल्लीत येतील. सध्या पूर्ण निकाल आले नाहीत. दिल्लीत काटे की टक्कर आहे. काँग्रेस आणि आप एकत्र असते तर निश्चित चांगली गोष्ट होती”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Uddhav Thackeray : फोडाफोडी करायची असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा, ठाकरेंचे आवाहन



Source link

Comments are closed.