Sanjay raut on pm narendra modi mumbai news in marathi
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती. याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आगामी जगणननेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती. याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आगामी जगणननेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. (sanjay raut on pm narendra modi mumbai news in marathi)
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्र सरकराने आगामी जगणननेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. त्यानुसार, जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला असला तरी, या निर्णयाचं श्रेय देशातील जनतेनं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिलं. सरकार मोदींची आणि सिस्टम राहुल गांधींचं सुरू आहे. राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा सातत्याने धरून ठेवला होता. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
याशिवाय, जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून अशा वेळी घेण्यात आला, ज्यावेळी देशातील जनता पहलगाम हल्ल्यावरून सरकारला प्रश्न विचारत आहे. पण जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत मोदी सरकारनं जनतेचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
“आगामी काळात बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुका आणि पहलगाम दहशतवादी हल्ला याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या सततच्या पाठपुरव्यामुळे सरकारला गुडघे टेकावे लागले. देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, त्यावर निर्णय होत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या 27 नागरिकांवर बोलावं”, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा – Uddhav Thackeray : तो कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे काय, महाराष्ट्र दिनी ठाकरेंचा सवाल
Comments are closed.