Sanjay Raut On PM Narendra Modi Slams S jay Shankar


अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे 104 भारतीय परत आले आहेत. बुधवारी (5 फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास त्यांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्कराचे सी-18 विमान अमृतसर विमानतळावर उतरले. पॅसेंजर टर्मिनलऐवजी ते हवाई दलाच्या एअरबेसवर उतरवण्यात आले आहे.

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे 104 भारतीय परत आले आहेत. बुधवारी (5 फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास त्यांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्कराचे सी-18 विमान अमृतसर विमानतळावर उतरले. पॅसेंजर टर्मिनलऐवजी ते हवाई दलाच्या एअरबेसवर उतरवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर निशाणा साधला. (Sanjay Raut On PM Narendra Modi Slams S jay Shankar)

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर निशाणा साधला. त्यानुसार, “बेकायदेशीरपणे अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांना हातात आणि पायात साखळ दंड घालून आणि अलकायदाचे दहशतवादी आहेत आणि अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी गेले होते, असं समजून त्यांना पुन्हा भारतात पाठवलं. या भारतीयांसोबत अत्यंत अमानूष वागणूक त्यांनी विमानात केली. 40 तास त्यांना पायात आणि हातात साखळ दंड घालून बसवलं. C-18 हे त्यांचं लष्करी विमान अमृतसरला उतरलं. भारताच्या हद्दीत आल्यावर तरी त्यांनी त्या भारतीय नागरिकांच्या हाता-पायात असलेल्या बेड्या काढायला हव्या होत्या. यामधून अमेरिकेनं भारताची इज्जत दाखवून दिली”, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेवर निशाणा साधला.

“घुसकोरीचं समर्थन कोणीही करणार नाही. आपणही घुसकोरीच्या संकटाशी नेहमी संघर्ष करत आहोत. पण माणुसकी असते आणि हाता-पायात बेड्या घालून कोणाची दिंड काढली जात नाही. अमेरिकेचा कायदा अमेरिकेत असेल. सर्वात आधी तुम्ही या भारतीयांना समन्स आणि नोटीस दिली असती की, तुम्ही एका विशिष्ठ तारखेच्या आत तुम्ही अमेरिका सोडा. त्यासंदर्भात आपल्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत अमेरिकेनं चर्चा करायला हवी होती. पण चर्चा केली नाही. चर्चा केली असती तर, त्यांची आम्ही त्यांना परत आणण्याची तयारी केली असती”, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

“ब्राझील, मेस्कीको, भारत यांसारख्या अनेक देशांत अमेरिकेनं घुसकोरांना परत पाठवलं. त्यामुळे संपूर्ण जगानं हा तमाशा पाहिला. विशेष म्हणजे काल राजयसभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर अमेरिकेची बाजू घेत होते. अमेरिकेचा कायदा सांगून त्यांची वकिली करत होती. त्यांनी अमेरिकेची निंदाही केली नाही. त्यांचंचं गुणगाण ते राज्यसभेत गात होते”, असं म्हणत संजय राउत यांनी एस जयशंकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचं समजतं. जर पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले, तर या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न करणार का, म्हणजेच भारतीयांना जनावर आणि दहशतवाद्यापेक्षा वाईट वागणूक दिली जात आहे. यावर तुम्ही ट्रम्प यांना प्रश्न विचारणार का, तुमची हिंमत आहे का, अशा सवाल आम्ही काल पंतप्रधानांना केला”, असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.


हेही वाचा – Uday Samant : ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात, मंत्री उदय सामंतांचा दावा



Source link

Comments are closed.