Sanjay Raut On PM Narendra Modi Talk On union budget 2025 Live Updates Budget 2025 news in marathi
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (1 फेब्रुवारी) माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर त्यांनी टीकेचे बाण सोडले.
Sanjay Raut On PM Narendra Modi मुंबई : गेल्या 10 वर्षात लक्ष्मी प्रसन्न केवळ भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर प्रसन्न झाली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र गौतम अदाणी यांच्या लक्ष्मी प्रसन्न झाली. या देशात सर्वात गरीब गौतम अदाणी आहेत, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. (Sanjay Raut On PM Narendra Modi Talk On union budget 2025 Live Updates Budget 2025)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (1 फेब्रुवारी) माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर त्यांनी टीकेचे बाण सोडले. त्यानुसार, “गोरगरीबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी, अशी मी प्रार्थना करतो. मग आता ही गोरगरीब कोण आहेत. गेल्या 10 वर्षात लक्ष्मी प्रसन्न केवळ भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर प्रसन्न झाली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र गौतम अदाणी यांच्या लक्ष्मी प्रसन्न झाली. या देशात सर्वात गरीब गौतम अदाणी आहेत. मोदी-शहा आणि भाजपचे मित्र आहेत. त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होण्यासाठी अर्थसंकल्प राबवले जात आहेत. त्यामुळे मोदींच्या बोलण्यावर जनतेनं विश्वास ठेवू नये”, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला.
“आतापर्यंत या देशातील अर्थव्यवस्थेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सरकारने ज्या योजना आखल्या त्या, देशातील अर्थव्यवस्था धुळीला मिळवणाऱ्या होत्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा घोषणा करतात तेव्हा, सर्वसामान्यांच्या पोटात गोळा येतो. हे सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी अजिबात नाही. 85 कोटी लोकांना फुकट देणं, हे अर्थव्यवस्था चांगलं असण्याचं लक्षण नाही. ज्या पद्धतीनं रुपया गाडला गेला. सध्या 87 रुपये असलेला रुपया ही अर्थव्यवस्थेची चांगली लक्षण नाहीत”, अशीही टीका संजय राऊतांनी केली.
हेही वाचा – Union Budget 2025 : आजच्या अर्थसंकल्पातून कोणत्या क्षेत्राला काय मिळणार? जाणून घ्या
Comments are closed.