“शांततेचा संदेश देऊन बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या थांबतील की इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे…”, संजय राऊत यांनी सुनावले
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात देशाला आणि जगाला शांततेचा संदेश दिला. पण या देशामध्ये सर्वच क्षेत्रात अशांतता, अस्थिरता आहे. त्याच्यामुळे शांततेचा संदेश देताना या देशातील अंशांतता कुणामुळे आहे? त्याला जबाबदार कोण आहे? याचा विचार देशातील जनता नक्कीच करत असेल, असे संजय राऊत म्हणाले. जगाला शांततेचा संदेश देत असताना राष्ट्रपतींनी बांगलादेशात जो हिंसाचार उसळला आहे याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे सूतोवाच संजय राऊत यांनी केले.
सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, बांगलादेशमध्ये रोज हिंदूंच्या हत्या होत आहे. कालही दोन हिंदूंना जिवंत जाळले. गेल्या चार-पाच महिन्यांपासून रोज तिथे हिंदूंच्या हत्या होत आहेत. मंदिरे तोडली जात आहेत, घरांवर हल्ले होत आहेत. हिंदूंना जाळले जाळताहेत, कापताहेत आणि मारताहेत. त्यामुळे फक्त शांततेचा संदेश देऊन हिंदूंच्या हत्या थांबतील की इंदिरा गांधी यांनी ज्या प्रकारे कारवाई केली अशा प्रकारची लष्करी कारवाई करून शांतता नांदेल ही एक चिंतेची गोष्ट आहे.
आमचा हा देश जरूर शांततावादी आहे. आम्ही कधीच कुणावर स्वत:हून हल्ला करत नाही. पंतप्रधानांनी ट्रम्पने सांगितल्यावर शांततेसाठी ऑपरेशन सिंदूर थांबवले, पण बांगलादेशमध्ये अशा प्रकारे शेकडो हिंदूंच्या हत्या होत असतील तर शांततेच्या संदेशाला काही अर्थ नाही. याचा अर्थ युद्ध करा असा होतोय का, तर नाही. पण बांगलादेशातील हिंदूंचे प्राण, संपत्ती वाचवावी लागेल आणि त्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांनी नुसते शांततेचे संदेश देऊन उपयोग नाही, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आले. याचाही संजय राऊत यांनी खास आपल्या शैलीत समाचार घेतला. कोश्यारी नावाच्या गृहस्थाने महाराष्ट्राचे राज्यपाल असताना उपद्व्याप केले. सगळ्यात आधी लोकशाही, संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार उलथवून टाकले. म्हणजे ज्या गोष्टी संविधानाने करायला नको होत्या, याबाबत सर्वोच्च न्यायालायने सांगितले आहे. चंद्रचूड यांनी सांगितले की, राज्यपालांनी काही अनावश्यक आणि बेकायदेशीर कृत्य केली. त्यांना काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातले सरकार पाडून भाजपचे किंवा शिवसेना तोडून त्या गटाचे सरकार आणायचे होते आणि त्यांनी ते करून दाखवले. त्यासाठी लोकशाही, संविधान, महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या. संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींना किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिले असेल तर मी त्याचा निषेध करतो.
महाराष्ट्रात संविधानाची हत्या केल्याबद्दल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण
महाराष्ट्रा सरकारने कोश्यारी यांचा निषेध केला पाहिजे. याच कोश्यारींनी राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना सरकारने पद्मभूषण दिले. हे त्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम आहे. याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निषेध केला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले
याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता!
महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते!
छान! pic.twitter.com/5xrZ0u6c9q— संजय राऊत (@rautsanjay61) 25 जानेवारी 2026
Comments are closed.