Sanjay Raut On Raj Thackeray slams cm devendra fadnavis


राज ठाकरे यांना ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात काही प्रश्न असतील तर, त्यांनी ते मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारायला हवेत. तसेच त्या दोघातील हा संवाद सर्वसामान्य जनतेसमोर लाईव्ह करायला हवा, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आवाहन दिलं.

Sanjay Raut On Raj Thackeray मुंबई : राज ठाकरे यांना ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात काही प्रश्न असतील तर, त्यांनी ते मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारायला हवेत. तसेच त्या दोघातील हा संवाद सर्वसामान्य जनतेसमोर लाईव्ह करायला हवा, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आवाहन दिलं. (Sanjay Raut On Raj Thackeray slams cm devendra fadnavis)

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत. राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहेत. आमच्या दृष्टिकोनात अमित शहा, नरेंद्र मोदी, फडणवीस यांची महाराष्ट्र संदर्भातली भूमिका ही चांगली नाही. अशा लोकांचे राज ठाकरे राजकीय मित्र आहेत. ते एकमेकांना मदत करतात. आता भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गोटातील या मित्राने ईव्हीएमचा घोटाळा, ईव्हीएममध्ये पडलेली मते कुठेतरी गायब झाली, त्याच्यामुळे हे सरकार सत्तेवर आले आहे. थोडक्यात हा घोटाळा आहे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घ्यायला हवी आणि फडणवीस काय उत्तर देतील हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दोघांमधील संवाद लाईव्ह दाखवायला पाहिजे”, असे संजय राऊत यांनी म्हटलं.

यावर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तर देतील का, असा सवाल विचारला असताना राऊतांनी नाही असं उत्तर देत म्हटलं की, “देवेंद्र फडणवीस यांचा खिसा हा सिमंत आहे. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना ते खिशात घालतील. फडणवीसांचा खिसा श्रीमंतांचा असून, त्या खिशात जे जातात ते पुन्हा येत नाहीत. पण तरिही ज्यांना प्रश्न पडले असतील, तर त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारले पाहिजेत”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

“इव्हीएमच्या घोटाळ्यातून महायुतीला विजय मिळाला असे जर राज ठाकरे म्हणत असतील तर, त्यांनी राजीनामा मागितला पाहिजे. त्यांच्याबरोबर चहा नका न पिता त्यांनी राजीनामा मागितला पाहिजे”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Sanjay Raut : गेल्या 10 वर्षात भाजपची तिजोरी आणि मोदींचा मित्र अदाणीवर लक्ष्मी प्रसन्न – संजय राऊत



Source link

Comments are closed.