Sanjay Raut On Shiv Sena Slams Shiv Sena MLA On Raj Thackeray Words News In Marathi
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरूवार 30 जानेवारी रोजी राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी विधानसभेतील मतदानावर भाष्य केलं.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भविष्यात अनेक आमदार आणि खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. शिवसेनेचे आमदार ही तसा दावा करत आहेत. अशात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांच्या या वक्तव्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा दाखला देत प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut On Shiv Sena Slams Shiv Sena MLA On Raj Thackeray Words News In Marathi)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरूवार 30 जानेवारी रोजी राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी विधानसभेतील मतदानावर भाष्य केलं. त्यावेळी मतदारांनी आपल्याला मतदान केलं, पण ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, असं सांगितलं. दरम्यान, राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याचा दाखला देत संजय राऊत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“राज ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यात आणि भाषणात एक भूमिका मांडली. की मतं कुठे गेली गायब झाली हे माहीत नाही. हे रहस्य आहे. त्याच पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत, ते सुद्धा रहस्य आहे. अशी कोणती जादुची कांडी आहे. या महाराष्ट्रात आणि या संघटनेत (शिवसेना) असं त्यांनी काय महान कार्य केलं आहे. ही संघटना बाळासाहेब ठाकरे यांची असून त्यांनी या सगळ्यांना जन्म दिला आहे. तुम्ही आपल्या आईला जेव्हा सोडून जाता तेव्हा लक्षात घ्या गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी पाप धुतली जाणार नाहीत”, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – Sanjay Raut On Uday Samant : उदय सामंतांचंच ऑपरेशन कधी होईल हे समजणार नाही – राऊत
Comments are closed.