Sanjay Raut On Uday Samant Slams On Tiger Operation By Shiv Sena News In Marath
उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं समजतं. पण त्यांचचं ऑपरेशन कधी होईल हे सांगता येणार नाही. कारण हा भाजप आहे, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदार व मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली.
मुंबई : उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं समजतं. पण त्यांचचं ऑपरेशन कधी होईल हे सांगता येणार नाही. कारण हा भाजप आहे, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदार व मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली. (Sanjay Raut On Uday Samant Slams On Tiger Operation By Shiv Sena News In Marath)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (31 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली. “उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं समजतं. पण त्यांचचं ऑपरेशन कधी होईल हे सांगता येणार नाही. कारण हा भाजप आहे. सध्या याचप्रकार राजकारण देशात सुरू आहे. सत्ता, पैसा आणि तपास यंत्रणांची कारवाई भीती यातून हे सगळं होत आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत”, असे संजय राऊत म्हणाले.
“जे टायगर आहेत त्यांच प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मात्र आता जे टायगर ऑपरेशन सुरू आहे. ज्याला वाइल्ड कॅट्स असतात, त्या इथे तिथे फिरत असतात. त्या कोण आहेत, त्याची मला नावं घ्यायची नाहीत. काही नाव समोर येतील, पण जी नावं समोर येतील त्यांना आमच्या शुभेच्छा. अनेक वर्ष ते शिवसेनेत होत. अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केलं. अनेक वर्ष त्यांना शिवसेनेनं पद आणि प्रतिष्ठा दिली. तरिही कोणी जात असेल तर, जोपर्यंत अशा प्रकारच्या प्रत्यक्ष बातम्या येत नाहीत. तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा – Namdev Shastri : मस्साजोगमधील आरोपींची मानसिकाताही समजून घेतली पाहिजे – नामदेव शास्त्री
Comments are closed.