मराठी माणूस म्हणूनच नाना हिंदी चित्रपटसृष्टीत दादा सारखे वावरले, संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटकला आला. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना पाटेकर यांच्या अकाली निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि मनोरंज क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
नाना पाटेकर हे अजब रसायन होते.ते वरून कितीही अवघड, ओबडधोबड वाटत असले तरी त्यांच्या आता एक हळवा माणूस सदैव समाजाला आपले अस्तित्व दाखवत असे तो नट म्हणून तर मोठा होताच पण माणूस म्हणून देखील उत्तुंग होता. नाटक, साहित्य, काव्य, सर्वत्र त्याचा संचार होता. त्यांच्या जाण्याने मी अस्वस्थ आहे, असे संजय राऊत म्हणाले.
नाना पाटेकरांचे देशप्रेम! कारगिलच्या युद्धात लष्करासोबत सीमेवर बजावले होते कर्तव्य
अंकुश पासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. माझ्या गंभीर आजारपणात जवळ जवळ रोज चौकशी करून धीर आणि मार्गदर्शन देणारा नाना सदैव स्मरणात राहील. मराठी माणूस म्हणूनच नाना हिंदी चित्रपट सृष्टीत दादा सारखे वावरले,बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती. नाना पाटेकर यांना विनम्र श्रद्धांजली आणि जय महाराष्ट्र! असे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
नाना पाटेकर हे अजब रसायन होते,
ते वरून कितीही अवघड,ओबडधोबड वाटत असले तरी त्यांच्या आता एक हळवा माणूस सदैव समाजाला आपले अस्तित्व दाखवत असे,
तो नट म्हणून तर मोठा होताच पण माणूस म्हणून देखील उत्तुंग होता,
नाटक,साहित्य,काव्य,सर्वत्र त्याचा संचार होता,त्यांच्या जाण्याने मी अस्वस्थ आहे,
अंकुश पासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे,
माझ्या गंभीर आजारपणात जवळ जवळ रोज चौकशी करून धीर आणि मार्गदर्शन देणारा नाना सदैव स्मरणात राहील,
मराठी माणूस म्हणूनच नाना हिंदी चित्रपट सृष्टीत दादा सारखे वावरले,बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती,
नाना पाटेकर यांना विनम्र श्रद्धांजली आणि जय महाराष्ट्र!— संजय राऊत (@rautsanjay61) 8 ऑक्टोबर 2026
Comments are closed.