पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; संजय राऊत यांची तीन शब्दात प्रतिक्रिया

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा एक गट महायुतीसोबत सत्तेत, तर दुसरा महाविकास आघाडीसोबत विरोधात आहे. असे असतानाही पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. यावरून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मंगळवारी सकाळी माध्यमांशी संजय राऊत यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत प्रश्न विचारला. यावर संजय राऊत यांनी त्यांचे स्वागत करतो, यापलीकडे माझ्याकडे शब्द नाहीत, अशी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. तसेच महानगरपालिका निवडणुकानंतर दोन्ही राष्ट्रवादी मोठा निर्णय घेणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.

याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, काय मोठा निर्णय असू शकतो? शरद पवार एनडीएसोबत जातील असे वाटत नाही. ते पुरोगामी विचारांचे नेते आहेत. शाहू, फुले, आंबेडकर आणि जात्यंध शक्तीविरोधात जी लढाई महाराष्ट्राने कायम लढली त्याचे सध्याचे शिलेदार आणि नेतृत्व शरद पवारांकडे आहे. आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहतो. त्याच्यामुळे असा वेडावाकडा, विचारधारेविरुद्ध जाण्याचा निर्णय ते घेतील असे आम्हाला वाटत नाही.

पुण्यात शिवसेना, काँग्रेस, मनसेची आघाडी पक्की

मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा किती असे विचारले असता राऊत म्हणाले की, मुंबईमधील सहा लोकसभा क्षेत्रामध्ये संयुक्त सभा होती. याशिवाय ठाणे, कल्याण-डोंबिवलीत होती. त्या संदर्भात नियोजन सुरू आहे.

दरम्यान, मुंबईत पंतप्रधान मोदींची सभा होण्याची शक्यता आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, मुंबईत मोदींना प्रचाराला यायची गरज काय? येथील भाजप नेते, मुख्यमंत्री प्रचाराला सक्षम नाहीत का? योगी आदित्यनाथ का येत आहेत प्रचाराला, काय संबंध आहे? इथलं वातावरण खराब करायचे आहे. आज कुणीतरी म्हटले की, मुंबईत फक्त ‘जय श्रीराम’ नारा चालेल. जय श्रीराम आमचे आदर्श आहेत, पण आम्ही मानतो की मुंबईत ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ नारा चालेल.

हास्यास्पद, धक्कादायक अन् लाजिरवाणे; शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपने फेकलेल्या जागांवर लढताहेत, संजय राऊत यांचा मिंध्यांवर निशाणा

Comments are closed.