Sanjay raut reply devendra fadnavis claim Urban naxals involved in Rahul Gandhi’s yatra


Sanjay Raut On Devendra fadnavis : फडणवीस एकप्रकारे गृहमंत्री अमित शाहांना आव्हान देत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत 40 नक्षली संघटना सहभागी झाल्याच्या गौप्यस्फोट गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत भडकले आहेत. तुम्ही कोण आहात? तुमच्या अवतीभवती कोण आहेत मग? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, “अर्बन नक्षलवाद ‘भारत जोडो यात्रे’त होता, हे तुम्ही ठरवणारे कोण आहात? अनेक निवृत्त अधिकारी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, तुषार गांधी, काँग्रसेच कार्यकर्ते, अखिलेश यादव आणि मी स्वत:हा भारत जोडो यात्रेत चाललो आहे. मी काय अर्बन नक्षलवादी आहे का?”

– Advertisement –

हेही वाचा : अधिवेशनचा शेवटचा दिवस अन् महायुतीकडून मोठी घोषणा शक्यता?

“अमोल पालेकर ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले होते. मग ते अर्बन नक्षलवादी आहेत का? तोंडाला येईल ते काहीही बोलता… तुमच्या हातात सत्ता आहे, म्हणून तुम्ही काहीही बोलता… परवाच गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल की, ‘नक्षलवाद आम्ही संपवून टाकला आहे.’ फडणवीस एकप्रकारे गृहमंत्र्यांना आव्हान देत आहेत. आम्ही सगळे ‘भारत जोडो’ आणि ‘भारत न्याय यात्रे’त सहभागी होतो. समाजातील प्रत्येक घटक यात्रेत सहभागी झाला होता,” असं राऊत यांनी सांगितलं.

– Advertisement –

“अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी भारत जोडो यात्रेचं स्वागत केले आहे. तुम्ही कोण आहात? तुमच्या अवतीभवती कोण आहेत मग?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरण; तीन दिवसानंतर धनंजय मुंडे आले समोर



Source link

Comments are closed.