Sanjay Raut reply to Radhakrishna Vikhe Patil criticism of Uddhav Thackeray


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. 23 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुंबई : महाराष्ट्रात सध्या धक्क्याचे राजकारण सुरू झाले आहे. कोण कोणाला धक्का देईल, हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. पण राजकारणात सध्या सर्वाधिक धक्के हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बसले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी स्वतःच स्वतःला धक्का पुरुष म्हटले आहे. पण त्यांच्या या विधानावर भाजपा नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती. उद्धव ठाकरेंना अनेक धक्के बसले आहेत. त्यामुळे धक्क्यातून सावरता सावरता त्यांच्या लक्षात येईना झाले आहे, असा टोला विखे पाटलांनी लगावला होता. त्यांच्या टीकेला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut reply to Radhakrishna Vikhe Patil criticism of Uddhav Thackeray)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. 23 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, कोण आहे हे विखे पाटील. ज्यांनी घाबरून दहा वेळा पक्ष सोडून गेले. या विखे पाटलांना व त्यांच्या वडिलांना पहिले मंत्रिपद उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. दहा वेळा साड्या बदलणारे हे लोक आहेत. यांनी आपल्याला शिकवू नये. आपण मातोश्रीवर येत होतात. शिवसेनेने, काँग्रेसने तुम्हाला सर्व काही दिले. ज्या शिवसेनेने तुम्हाला मान प्राण प्रतिष्ठा दिली त्यांच्याबद्दल तुम्ही असे वक्तव्य करता हा निर्लज्जपणा आहे, असे प्रत्युत्तर राऊतांनी दिले आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : अटकेच्या भीतीनेच एकनाथ शिंदे कर्नाटकात गेले नाहीत, राऊतांचा दावा

एकनाथ शिंदे घाबरलेले व्यक्तिमत्त्व

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात अमित शहांना लोहपुरुषाची उपमा दिली. त्यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे हे घाबरलेले व्यक्ती आहेत. लोहपुरुष जर अमित शहा आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोण आहेत? हे एकनाथ शिंदे घाबरलेले, लाचार आहेत. खरी शिवसेना कोण व खोटी कोण हे अमित शहा सत्तेत नसतील तेव्हा सर्वांना कळेल. आज दहशत, दबाव, पैशांची ताकद, निवडणूक आयोग ताब्यात घेऊन तुम्ही सर्व करत आहात. एकनाथ शिंदेनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमादार निवडून आणून दाखवावे. जे चिन्ह चोरले आहे, ते परत करावे व नवीन चिन्ह घेऊन लढवून दाखवावे. बाळासाहेबांच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या करता आणि आम्हाला अमित शहांची दादागिरी दाखवता. अमित शहा काही अमृत पिऊन आलेले नाहीत. कधी ना कधी जायचेच आहे प्रत्येकाला. तेव्हा जनता फैसला करेल, असा जोरदार घणाघात संजय राऊत यांनी केला.



Source link

Comments are closed.