Sanjay Raut Shivsena UBT criticized Amit Shah and BJP asj
मुंबई : नुकतेच शिर्डीमध्ये भाजपचे महाअधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या महाअधिवेशनाला हजेरी लावली होती. रविवारी (12 जानेवारी) झालेल्या या महाअधिवेशनात अमित शहांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील निशाणा साधला होता. यावरून सोमवारी (13 जानेवारी) शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांवर टीका केली. “उद्धव ठाकरे यांचा अपमान करणे, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणे आहे.” असे म्हणत त्यांनी अमित शहांच्या टीकेला उत्तर दिले. (Sanjay Raut Shivsena UBT criticized Amit Shah and BJP)
– Advertisement –
“उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेने दगाफटका केलेलाच नाही. तर भाजपाने गद्दारीला खतपाणी घालण्याचे काम अमित शाह आणि पंतप्रधान मोदींनी केले आहे. आता तेच अमित शाह, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणे हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. या वाक्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या हा महाराष्ट्राचा अपमान आहे.” असे म्हणत संजय राऊत यांनी अमित शहांवर टीका केली.
– Advertisement –
यावेळी संजय राऊत पुढे म्हणाले की, “शरद पवार यांनी अख्खी हयात राजकारण आणि समाजकारण यांच्यासह सार्वजनिक आयुष्यात घालवली. शरद पवार यांनी पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दांत टीका करणे हे महाराष्ट्रातील भाजपाच्या लोकांना पटले आहे का? आवडले आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. कोणीतरी बाहेरचे लोक येतात, पदावर असणारे नेते असतील. पण ज्यांनी महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेचा आणि शरद पवारांचा अपमान करता आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला.
Comments are closed.