Sanjay Raut Shivsena UBT on Congress and MVA asj
मुंबई : गेल्या काही काळापासून महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. अशामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर, शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (13 जानेवारी) काँग्रेसला विनंती केली आहे. “गेल्या काही दिवसापासून आमच्या घटकपक्षाशी संवाद तुटला आहे. संवाद जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही.” असे म्हणत टोला लगावला आहे. (Sanjay Raut Shivsena UBT on Congress and MVA)
हेही वाचा : Thackeray about INDIA : काँग्रेस हेच समजून घ्यायला तयार नाही, ठाकरे गटाने सुनावले
– Advertisement –
“संवाद तुटल्याने भाजप शिवसेना युती तुटली होती. 2019मध्ये योग्य प्रकारे संवाद न झाल्याने ती युती तुटली होती. महाविकास आघाडी तर सोडून द्या, इंडि आघाडीत 30 पक्ष आहेत. 30 पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे, हा सल्ला उद्धव ठाकरेंनी अनेकदा सांगितले आहे. इतर प्रमुख नेत्यांनीदेखील हा विषय मांडला होता. एक सत्य आहे, की ही इंडि आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली होती. हे जरी खरे असले, तरीही लोकसभा निवडणुकीत इंडि आघाडीने चमकदार कामगिरी केली आहे.” असे खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
मविआ विसर्जित करण्याची मागणी केलेली नाही
“येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमच्या पक्षाची इच्छा आहे. कारण त्यामुळे पक्षाचा पाया मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. पण विरोधकांची इंडि आघाडी किंवा महाविकास आघाडी विसर्जित करण्याची मागणी आपण कधीही केली नाही,” असे शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उद्देश हा पक्ष कार्यकर्त्यांना सक्षम बनवणे आणि संघटना पातळीवर पक्षाला बळकट करणे आहे. आम्ही कधीच म्हणालो नाही की इंडि आघाडी किंवा मविआ विसर्जित करावी.” असे त्यांनी स्पष्ट केले.
– Advertisement –
स्वबळावर लढण्याच्या शिवसेना उबाठा गटाच्या निर्णयावर अनेक काँग्रेस नेत्यांनी टीका केली. यावर ते म्हणाले की, “काँग्रेस सदस्यांनी माझे सर्व मुद्दे ऐकून घेतल्यावरच प्रतिक्रिया द्याव्यात. त्यांना इतरांचे ऐकून घेण्याची सवय असली पाहिजे,” असा सल्ला दिला. “शिवसेनेला आपले मशाल हे निवडणूक चिन्ह स्थानिक पातळीवरील मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहे. आमच्याकडे वेळ आहे कारण पुढच्या लोकसभा तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी साडेचार वर्षे बाकी आहेत,” असे ते पुढे म्हणाले.
Comments are closed.