मुंडेंसारखाचा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार; त्यासाठी भाजपचेच लोक आम्हाला हत्यार पुरवताहेत, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात अशी अनेक पात्र आहेत ज्यांचे चेहरे आता समोर येत आहेत. धनंजय मुंडे यांचा बळी गेलाच असून अजून काही अशा प्रकारचे लोक आहेत. जयकुमार रावल यांनी ‘रावल को. ऑप. बँके’मध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून ठेवले आहेत. कुटुंबातील लोकंच खोटी कर्जदार उभी करून त्यांनी जनतेचा पैसा लाटला, हे अत्यंत गंभीर आहे. हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार असून तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिला आहे का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन त्यांनी लाटली. राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत गेली आणि हायकोर्टाने आता त्याच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. असे किमान सात ते आठ मंत्री सरकारमध्ये आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे वातावरण खराब केले आहे. अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भाजपचे हत्यार पुरवत आहेत, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाइतकेच फडणवीस क्रूर शासक अशी टीका केली आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, भाजपच्या लोकांची राज्य करण्याची पद्धत ही कपट आणि कारस्थानाची आहे. कपट आणि कारस्थान राजकारणामध्ये कुणी आणले असेल तर ते भाजपच्या लोकांनी आणले. विरोधकांना तुरुंगात टाकणे, कुटुंबीय, मित्र-परिवाराचा छळ करणे अशा अनेक गोष्टी केल्या आहेत.

ते पुढे म्हणाले की, देशाच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा हा भाजप आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पूर्णपणे खतम केला. मोदी-शहा-फडणवीस यांनी निर्माण केलेल्या राजकारणाचा एक पॅटर्न मागच्या पाच वर्षात आपण पाहिलेला, अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक आग, संताप नक्कीच आहे.

औरंगजेबाइतकेच फडणवीस क्रूर शासक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डागली तोफ

महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी दिलेली उपमा हे त्यांचे मत आहे. पण हे बोलण्याची वेळ आपल्या राजकीय विरोधकांवर का येते याचे आत्मचिंतन भाजपने केले आहे. हर्षवर्धन सपकाळ औरंगजेब म्हटले, आता भाजपवाले त्यांना अफझलखान म्हणतील. तुम्ही तुमच्या राज्यकारभारात सुधारणा केली पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य बनवले, हा त्यांचा विचार तुम्ही मान्य करा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले

Comments are closed.