रशियाकडून तेल खरेदी बंद? मोदी ट्रम्पला घाबरले; विश्वगुरुंची जगात काय पत आहे हे दिसलं; संजय राऊत कडाडले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ आणि रशियाकडून तेल व शस्त्रास्त्र आयात केली म्हणून हिंदुस्थानला दंड ठोठावला होता. यानंतर सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे तूर्तास थांबवल्याचे वृत्त आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला. मोदी ट्रम्पला घाबरले असून यामुळे विश्वगुरूंची जगात काय पत आहे हे दिसल्याची टीका राऊत यांनी केली. ते शनिवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, हिंदुस्थान आणि रशियाचे जुने संबंध आहेत. रशिया आपला विश्वासू मित्र आहे. रशियासोबत आपण अमेरिकेच्या आधीपासून व्यापार कत आहोत. पण तिकडून डोनाल्ड ट्रम्पने इशारा केला अन् इथे आपल्या लोकांनी रशियासोबत व्यवहार बंद केला. हे योग्य नाही.

दंगलींना सरकारी पक्षातर्फेच चिथावणी, वातावरण तापवून निवडणुकांना सामोरं जायचं हे भाजपचं राष्ट्रीय धोरण! – संजय राऊत

हिंदुस्थान हे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. हिंदुस्थानमध्ये लोकशाही असून हा 140 कोटींचा देश आहे. आम्ही हव्या त्या देशाशी व्यापार करू शकतो. ट्रम्प सांगेल तसे आम्ही वागणार नाही. कुणाशी व्यापार करायचा आणि कुणाकडून तेल खरेदी करायचे अशी धमकी ट्रम्प देऊ शकत नाही. हिंदुस्थान आणि मोदी सरकारला अशा धमक्या ट्रम्प देत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. विश्वगुरूंची जगात काय पत आहे हे यावरून दिसते. हे सरकारचे अपयश आहे. जगातील एकही देश आपल्यासोबत उभा नाही ही हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

बोनो ट्रम्प – ट्रम्पो वीथ! हिंदुस्थांडेन आणि तेल खरेदी थांबली.

Comments are closed.