पंतप्रधान इस्रायल-अमेरिकेच्या हातची कठपुतली, खामेनींच्या हत्येचा शोक व्यक्त करू शकत नाहीत, कुणी ब्लॅकमेल करतंय की कुणाकडे फाईल आहे? – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार इस्रायल-अमेरिकेच्या हातची कठपुतली झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. जेव्हा एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांची हत्या होते, जो प्रदीर्घ काळापासून देशाचे नेतृत्व करतोय आणि तो देश परंपरेने हिंदुस्थानचा मित्र आहे. तरी पंतप्रधान शोक व्यक्त करू शकत नाहीत. त्यांना कुणी ब्लॅकमेल करतेय का? कुणाकडे कुठली फाईल आहे का? अशी चर्चा जगभरात सुरू असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत बुधवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांची हत्या होते तेव्हा त्याबद्दल शोक व्यक्त करणे हा एक शिष्टाचार असून तो पाळणे गरजेचे आहे. युद्ध काळात देशाचे पंतप्रधान नेतन्याहूंना फोन करतात, जॉर्डनच्या राजाला फोन करतात, तसेच सौदी, कुवैत, दुबईच्या प्रिन्सला फोन करतात. पण ज्या देशावर सगळ्यात मोठे संकट आहे, ज्या देशावर हल्ला झालेला आहे, ज्या देशाचे सर्वोच्च नेते हल्ल्यात मारले गेलेत त्यांना सुद्धा फोन करणे किंवा शोक संवेदना व्यक्त करणे याला आम्ही शिष्टाचार म्हणतो. इतर देशांना काय वाटेल म्हणून शोक संवेदना व्यक्त करायच्या नाहीत, हे चुकीचे आहे. हा एक शिष्टाचार सुद्धा आपण पाळत नसू तर आपले परराष्ट्र धोरण माती खातेय एवढेच सांगावे लागेल, असे राऊत म्हणाले.

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार उभा राहील, संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल! – संजय राऊत

Comments are closed.