कोश्यारींसारख्यांना पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी जोड्याने मारलं असतं, संजय राऊत यांची टीका
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरतात असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला.
”ज्यांना नीट धोतर नेसता येत नाही ते काय आम्हाला अक्कल शिकवतात. जे धोतर नीट नेसू शकत नाही ते काय ठाकरेंना सांगणार? मोदीला कोण घाबरतंय, डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत नाही मोदींमध्ये. गांधींचं भाषण सुरू असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अमित शहांनी संसदेतून पलायन केलं. ते आम्हाला सांगतायत भीती. हातात सत्ता व तपास यंत्रणा आहेत. एक नंबरचा लफंगा माणूस आहे. छत्रपतींचा, महात्मा फुलेंचा अपमान करणाऱ्या या माणसाला भाजपने पद्मभूषण दिलंय. हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाहीये मिस्टर फडणवीस. अशांना पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी जोड्याने मारलं असतं”, असे संजय राऊत म्हणाले.
उद्योगपतीवरील खैरातीतून मिळणाऱ्या रिटर्न गिफ्टवर भाजप निवडणूका लढते
पिपंरी चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्याचा 16 एकरच्या जमीन व्यवहाराबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”मेहेरबानीवरच हे राज्य चाललेलं आहे. अदानीवर खैरात, बिल्डरांवर खैरात. पार्थ पवारांचं प्रकरण समोर आलं. या खैरातीवरच हे राज्य टीकून आहे. या खैरातीवर भाजपला जे रिटर्न गिफ्ट मिळते त्यावरच निवडणूका लढवल्या जातात. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जमिनीच्या खैराती सरकारकडून होत आलीय. फडणवीस म्हणतात विश्वास ठेवा पण नाही ठेवता येत त्यांच्यावर विश्वास”, असे संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.