त्यांचा अख्खा पक्षच दगाबाजीतून सत्तेत आला! संजय राऊत यांचं अमित शहांना सणसणीत उत्तर
अमित शहा ज्या व्यासपीठावरून बोलत होते त्या व्यासपीठावरील 22 पैकी 18 नेते हे दगाबाजीकरून त्यांच्या पक्षात आलेले होते. मूळात देशात व महाराष्ट्रात त्यांचा अख्खा पक्षच दगाबाजीतून सत्तेत आला आहे, असं सणसणीत उत्तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना दिले.
संजय राऊत यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक्स या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की , आम्ही अमित शहा यां कालच्या वक्तव्यामागे नक्की काय आहे याच्यावर आम्ही गप्पा मारल्या. त्यांनी जनसंघाशी संबंधित काही जुन्या आठवणी सांगितल्या. कदाचित त्या काळात अमित शहा राजकारणात नसतील. त्यांना जनसंघाचं व शरद पवारांचं नातं माहित नसावं. तसंच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आणि भाजपचं पूर्वीचं नातं काय होतं याबाबत अमित शहांनी थोडं रिसर्च करणं गरजेचं आहे. शिर्डीत व्यासपीठावर त्यांनी दगाबाजीवर जोरदार भाषण केलं. त्या व्यासपीठावर जे 22 लोकं होते त्यातले 18 लोकं त्यांच्या पक्षाशी दगाबाजी करून त्यांच्या पक्षात आले होते त्याच व्यासपीठावर अमित शहा दगाबा-जीवर बोलतायत ही गंमत आहे. त्यांचा अख्खा पक्ष महाराष्ट्र व देशात दगाबाजीतून निर्माण झालेला आहे वाढलेला आहे ते अमित शहा आम्हाला दगाबाजीवर शिकवतायत. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात. महाराष्ट्रातला त्याचा पक्ष दगाबाजीतून सत्तेवर आलेला पक्ष आहे. त्याच्या मंत्रीमंडळातले 80 टक्के लोकं दगाबाजी पक्षांतर करून आलेले आहेत. 40 टक्के आमदार पक्षांतर करून आलेले आहेत. आणि आमचे गृहमंत्री दगाबाजीवर भाषण देतायत. त्यापेक्षा बीड परभणीत काय चाललं आहे ते बघा. मणिपूरमध्ये काय चाललं आहे ते पाहा. तिकडे तुमचं दुर्लक्ष आहे हेच एक प्रकारे देशाशी दगाबाजी सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.