कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा ते सांगा; संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

बुलढाण्यात कैसाल नागरे या तरुण शेतकऱ्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मुख्यमंत्र्यांना चार पानी पत्र लिहिले. त्याविषयी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.
”कैलास यांच्या आत्महत्येविषयी सामनात आज अग्रलेख आहे. सामना हे एकमेव वृत्तपत्र आहे ज्याने या आत्महत्येवर अग्रलेख लिहला आहे. या सरकारने अद्याप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोंड उघडलेले नाही. हे ढोंगी आणि दुतोंडी सरकार आहे. हे सरकार विरोधकांवर बोलतील, राजकारणावर बोलतील पण शेतकऱ्यांवर बोलत नाही. ज्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याला कृषी क्षेत्रातला पुरस्कार मिळाला होता. त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कृषी मंत्र्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली. ही एका कैलासची आत्महत्या नाही तर सरकारने केलेली शेकडो शेतकऱ्यांची हत्या आहे. कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे, या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. सरकार काहीच करत नाही हे सरकार निक्कम आहे म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली. लाज वाटत नाही या सरकारला. अजित पवार, एकनाथ शिंदे व मिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी आपलाच जाहीरनामा परत वाचला पाहिजे व माफी मागितली पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.
”निवडणूकीत मतं मिळविण्यासाठी यांनी लाडकी बहिण योजनेचं 1500 रुपयाचं दुकान लावलं, शेतकऱ्यांना तीन लाखाची कर्जमाफी जाहीर केली. लाडकी बहिणचे 1500 चे जिंकून आलो तर 2100 करू सांगितले. मात्र प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. ना लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले, ना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. अनेक योजना बंद केल्या. आनंदाचा शिक्षा बंद केला. वर शेतकरी आत्महत्या करतोय त्यावर काही उपाययोजना नाही. सरकार कशाला चालवताय. कायद्याच्या दृष्टीने राज्यात हाहाकार माजला आहे. कुणाचा पायपूस कुणाच्या गळ्य़ात नाही. काल संपूर्ण सरकार रंग उधळण्यात व्यस्त होतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Comments are closed.