बॉलिवूडला संरक्षण देण्याची वेळ का येतेय त्याचं मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावं – संजय राऊत
टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॉलिवूडवाल्यांना गरज असेल तर संरक्षण देऊ असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की गरज लागली तर बॉलिवूडला संरक्षण देऊ याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. ”बॉलिवूडला संरक्षण आणि जनतेवर गोळ्या झाडल्या तरी चालतील? बॉलिवूडला संरक्षण देण्याची वेळ का येतेय त्याचं मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावं. मुंबईतली कायदा सुव्यस्था बिघडली आहे. मुंबई गुंडांच्या बिल्डरांच्या हातात गेली आहे. हे सगळे बिल्डर व गुंड भाजपचे नम्र सेवक आहेत. लॉरेन्स बिष्णोईला अमित शहांचं पूर्ण पाठबळ आहे. सलमान खान, बाबा सिद्दीकी, टायगर श्रॉफ, प्रदीप पूर्णेकर अशा किती जणांच्या हत्या झाल्या आहेत, मुख्यमंत्री कधी असं म्हणत नाही की पूर्णेकरांच्या कुटुंबांना सुरक्षा देऊ असं कधी म्हणत नाही? बॉलिवूडला संरक्षण देणार का ते तुमचे प्रचारक आहेत म्हणून का? टायगर श्रॉफचे पिताश्री जॅकी श्रॉफ म्हणत होते की देश सुरक्षित हातात आहे म्हणून? आता त्यांना कळले असेल की देश किती सुरक्षित हातात आहे ते”, असे संजय राऊत म्हणाले.
”मोहन भागवत अलीकडे फार परखड सत्य बोलायला लागले आहेत. हा परखडपणा त्यांनी कायम ठेवला तर देशाचा स्वाभीमान जागा होईल. आज दसरा मेळाव्यात त्यांनी जगदीश धनखड यांना आमंत्रीत केलं. हे तेच धनखड आहेत ज्यांना उपराष्टपती पदावरून मोदी व शहांमुळे पायउतार व्हावं लागलं. धनखडांनी स्वाभीमानी भूमिका घेतली होती. त्या धनखडांना बोलवून संघाने दाखवून दिलं की संघ हा स्वतंत्र अस्तित्व असलेली संस्था आहे तो मोदी शहांचा गुलाम नाही. जर हा परखडपणा कायम राहिला तर पुढच्या सहा महिन्यात सत्तापालट होऊ शकते”, असे संजय राऊत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी ”भागवत साहेब, आंदोलन योग्य दिशेनेच सुरू आहे. तुमच्या मनात जे आहे तेच आम्ही करत आहेत. तुम्हालाही देशातील सत्ता बदलायची आहेत. तुमच्या मनातली भावना आम्हाला माहितआहे. तुम्हालाही मोदी शहांना पळवून लावायचे आहे”, असेही ते म्हणाले.
तर आम्ही ज्ञानेश कुमारांच्या पार्श्वभागावर जी लाथ मारतोय ती बरोबर आहे
गोकूळची निवडणूक ही पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूरसारख्या भागातील एक फार महत्त्वाची निवडणूक आहे. शेतकरी यात मतदान करतात. मुख्यमंत्री यात लक्ष घालतात. काल तीन जागांवर सतेज पाटील यांच्या पॅनेलने जिंकल्या होत्या तिथे फेरमतमोजणी करायला लावून पाटलांच्या विरोधातील पॅनेलला जिंकवून आणायला दबाव आणला व त्यांना जिंकून दिले. जर मुख्यमंत्री अजुनही अशा निवडणूकीत हस्तक्षेप करत असतील तर आम्ही जी ज्ञानेश कुमारांच्या पार्श्वभागावर जी लाथ मारतोय ती बरोबर आहे. निवडणूका ताब्यात घेऊन स्वत:ला विजयी घोषीत कऱण्याची सवय यांना ज्ञानेश कुमार व राजीव कुमार यांच्या मुळे लागली आहे. तरिही सतेज पाटील यांनी या निवडणूकीत झेंडा फडकवला. समोरचं पॅनेल देवेंद्र फडणवीस यांचं होतं. अनेक नेत्यांची मुलं पराभूत झाली आहेत. हे सर्व मतदान बॅलोट पेपरवर झालं. समोरच्या पॅनेलला मिळालेल्या अर्ध्या जागा या चोरलेल्या आहेत”, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.
हे सरकार सत्तेत राहिले तर देशात अराजकता माजेल
ही सरकार राहिली तर अराजकता पसरणारच. सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष दिले पाहिजे. आम्ही जेव्हा बोलतो की सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि तुम्हीच या देशाला वाचवू शकता. ज्या प्रकारे या देशात मोदींची सरकार तिरंगा फडकवल्याचाही विरोध करतेय. याचा अर्थ हे राष्ट्रभक्तांची सरकार नाही. परत एकदा इस्ट इंडिया कंपनीचे सरकार देशात व महाराष्ट्रात आणत आहेत. तिरंगा नाही फडकवू शकत तर काय फकडवू शकतो. याने अराजकता पसरेल व त्याला जबाबदार मोदी शहा व फडणवीस आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे.
अमित शहा नशामुक्तीची नौटंकी करतायत
”अमित शहा नशामुक्ती साठी पंजाबचा दौरा करणार आहेत, हा सर्वात मोठा एक जोक आहे. ज्याच्या सत्तेत सर्वात जास्त ड्रग्ज, नशेचा बाजार वाढला. नशेचा सर्व कारोबार गुजरातमधून केला जातो. सर्वात जास्त ड्रग्ज गुजरातच्या मुंदडा येथून तस्कर केले जाते. पंजाबच्या आधी उडता गुजरात झाले आहे. सर्वात आधी गुजरातमधून नशामुक्तीचे आंदोलन सुरू करा. पंजाबमध्ये निवडणूका आहेत म्हणून या नशामुक्तीची नौटंकी करत आहेत”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला
Comments are closed.