गौतम अदानी ही मोदींची बेनामी संपत्ती, त्यांच्यावर भार लावा; संजय राऊत यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहिल्यानगर येथे केलेल्या भाषणातून आज अधोरेखित झाले. पंचनामे होऊ द्या, मग मदतीचे पाहू, असे अमित शहा म्हणाले आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार व केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. ”महाराष्ट्र पण तुमच्याच देशाचा भाग आहे, तुम्ही प्रस्तावाशिवाय मदत पाठवू शकता, गुजरातला केली होतीच ना तौक्ते वादळाच्या वेळी. ते वादळ आले होते तेव्हा शहा आणि मोदी यांनी विमानात बसताना हजारो कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती”, अशा शब्दात संजय राऊत यांना मोदी सरकार व अमित शहांना सुनावले.

”शेतकऱ्यांचा उस घेणाऱ्या महाराष्ट्रावर भार लावण्यापेक्षा गौतम अदानीवर, लोढा, अंबानी, कंबोज यांच्यावर भार लावा”, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी व महायुती सरकारला फटकारले आहे. शेतकऱ्यांचा उस घेणाऱ्या महाराष्ट्रावर हा भार घालण्यापेक्षा गौतम अदानीवर भार लावा. त्याला मुंबईतल्या जागा फुटकात, मिठागरं, खणीज संपत्ती, टोलनाके फुकटात दिले. शेतकऱ्यांवर व कारखानदारांवर भार देण्यापेक्षा लोढा, अडाणी, अंबानी, कंबोज यांच्यावर भार लावा. गौतम अडाणी ही मोदींची बेनामी संपत्ती आहे. हिंमत आहे का अडाणीवर भार लावा. घ्या अडाणीकडून 50हजार कोटी, घ्या अंबानीकडून 20 हजार कोटी कडून. त्यांच्यावर भार लावत नाही. तुम्ही राज्याची ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोडून काढतायत, असे संजय राऊत म्हणाले.

”मी महायुती मानत नाही. हे शिंदे, अजित पवार गट जे आहेत ते अमित शहांच्याच बेनामी कंपन्या आहेत. त्यांच्यातील 90 टक्के शेअर्स अमित शहांकडे आहेत त्यांना वाटेल तेव्हा ते या कंपन्या बंद करतील”, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रस्ताव पाठवा मग मदत पाठवू असं बोलले म्हणजे असून महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप प्रस्ताव नाही पाठवला. इतके दिवस झाले अजून प्रस्ताव नाही. पण महाराष्ट्र पण तुमच्याच देशाचा भाग आहे, तुम्ही प्रस्तावा शिवाय तुम्ही मदत पाठवू शकता, गुजरातला केली होतीच ना तौक्ते वादळाच्या वेळी. ते वादळ आले होते तेव्हा शहाआणि मोदी यांनी विमानात बसताना हजारो कोटी रुपये दिले होते, असेही ते म्हणाले.

Comments are closed.