अर्थसंकल्प समजायला 72 तास लागतात, मोदींना त्यातलं काय कळलं जे ते जोरजोरात बाकं वाजवत होते? संजय राऊत यांचा टोला
शनिवारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाकं वाजवत होते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींना जोरदार टोला लगवला आहे. ”अर्थसंकल्प समजायला 72 तास लागतात. बाईंनी अर्थसंकल्प वाचला व आम्हाला समजलं असं कुणी म्हणतं असेल तर ते मुर्ख आहेत. आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ञ आहेत ज्यांना एवढ्या लगेच अर्थसंकल्प कळला. अर्थसंकल्पाचे भाषण सुरू असताना मोदी जोरजोरात बाकं वाजवत होते, त्यांना काय अर्थसंकल्प कळला? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
”अर्थमंत्रीपदावरील व्यक्ती खडूसच असायला पाहिजे. अग्रलेखात त्या बाईंना खडूस म्हटलं त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही अग्रलेख नीट वाचा. अर्थमंत्रीपदावरची व्यक्ती खडूस, कठोर व दयाबुद्दीने काम न करणारी असते. तिला फक्त देशाच्या तिजोरीत महसूल जमा करायचा असतो. त्यासाठी कुणाच्या खिशात हात घालायचा, कुणाची पाकिटं मारायची यासाठी अर्थमंत्र्यांची नेमणूक असते. प्रधानमंत्र्यांना ज्या गोष्टींचा वाईटपणा घ्यायचा नसतो त्या गोष्टी अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून करून घेत असतात”, असं संजय राऊत म्हणाले.
”या अर्थसंकल्पात महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहे का? महागाई व बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं कसं भलं होणार. रुपया 87 वर आला आहे. रुपया मजबूत करण्यासाठी काही योजना आहेत का? 12 लाखापर्यंत जो इनकम टॅक्स स्लॅब आहे त्यापलिकडे मध्यमवर्गीयांसाठी किंवा गरिबांसाठी कोणतीही योजना मला दिसत नाही. 12 लाखावरचं इनकम टॅक्स भरण्यासाठी तेवढं इनकम आणावं लागेल ना. एवढं इनकम कुणाकडे आहे? अनेक लोकं कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात. उच्च शिक्षित पदवीधर कॉ़न्ट्रॅक्टरवर काम करत आहेत. त्यांचं उत्पन्न थेट कागदावर येत नाही. त्यांच्यातील किती लोकांचं उत्पन्न 12 लाखवाले किती आहेत. याचा खुलासा ज्यांना आपण खडूस म्हणताय त्यांनी करायला हवा, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
”अर्थसंकल्प समजायला किमान 72 तास लागतात. बाईंनी अर्थसंकल्प वाचला व आम्हाला समजलं असं कुणी म्हणतं असेल तर ते मुर्ख आहेत. आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ञ आहेत ज्यांना एवढ्या लगेच अर्थसंकल्प कळला. मोदी जोरजोरात बाकं वाजवत होते, त्यांना काय अर्थसंकल्प कळला? असा टोला संजय राऊत यांनी मोदींना लगावला.
Comments are closed.