रामाच्या मंदिरावर दरोडे घातले, त्यांच्या पक्षामध्ये हे बूट चाटायला गेले; संजय राऊत यांनी गद्दारांचा घेतला समाचार

प्रभू श्रीरामाच्या मंदिरात ज्याने आता 200, 300, 400 कोटींच्या दानपेट्या चोरल्या. रामाच्या मंदिरावर दरोडे घातले, त्यांच्या पक्षामध्ये हे बूट चाटायला गेले, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गद्दार खासदारांचा समाचार घेतला. वाशिममधील कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊत यांनी भाजपसह गद्दारांवर निशाणा साधला. अलीकडे मी भाषण फार कमी करतो. उद्धवसाहेब तुम्हाला माहिती लोक म्हणतात, मी शिवराळ भाषा वापरतो. मी अत्यंत सभ्य माणूस आहे. माझ्यावर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत आणि ते संस्कार असे आहेत की, हरामखोराला हरामखोरच म्हणा. हरामखोराला हरिश्चंद्र म्हणायचं नाही, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.

हा तुमच्या इथे 50 कोटीवाला जन्माला आलेला आहे. बैल विकतो, गाढव विकतात, बकरं विकलं जातं, तुमच्याकडे पन्नास कोटीला खासदार विकला गेला. आता या खासदाराचं करायचं काय? या खासदाराला 2029 परत दिल्ली दाखवायची नाही. हा गद्दार बेईमान माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चार तासापूर्वी सांगत होता, साहेब मी कुठेच जात नाही. मी तुमच्याबरोबरच आहे. काही लोकांनी आईबाबाची शपथ घेतली. काही लोकांनी साईबाबाची शपथ घेतली. आणि सगळ्या शपता घेऊन 50 कोटीला विकले गेले. चिंता नाही, हा निष्ठावंत शिवसैनिक त्याला गाढल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्या पक्षात गेले तर ज्याने आता हिंदुत्वाच्या नावाने, राम मंदिराच्या नावाने लूट सुरू केलेली आहे, प्रभू श्रीरामाच्या मंदिरात ज्याने आता 200, 300, 400 कोटींच्या दानपेट्या चोरल्या. रामाच्या मंदिरावर दरोडे घातले, त्यांच्या पक्षामध्ये हे बूट चाटायला गेले.

शिवसैनिक कोणतेही आव्हान स्वीकारायला तयार असतो. शिवसैनिकाचा जो प्राण आहे, तो प्राण म्हणजे निष्ठा आहे, निष्ठा लक्षात ठेवा. आणि निष्ठा कोणाकडे असते? एकनिष्ठ राहण्यासाठी मी नेहमी सांगतो, एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. ज्यांचे नाही ते निघून गेले. आम्ही आमच्या आईशी प्रामाणिक आहोत. शिवसेना आमची आई आहे, या शिवसेनेने महाराष्ट्राला, मराठी माणसाला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, कायम आधार दिला, ताकद दिली आणि या यवतमाळ जिल्ह्याने, वाशिमने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं की, खासदार दिले, आमदार दिले आणि हेच प्रेम आपण उद्धवसाहेबांच्या बाबतीत आदित्यसाहेबांच्या बाबतीत कायम ठेवा. उद्धवसाहेब लोक आपल्यावरती टीका करतात आपण फिरत नाही. उद्धवसाहेब जर फिरले नसते तर, हा घाऱ्या खासदार झाला असता का? हा कुठेतरी अडगळीत पडला होता. त्याला उद्धवसाहेबांनी उचलून आणला, सगळ्यांनी आमच्या अरविंद सावंतानी वगैरे आणि दिल्लीला पाठवला. अरे थोडी तरी लाज बाळगा. पण अशा बेईमान लोकांना घडवण्याची फॅक्टरी कोणती असेल तर ती मिंधे फॅक्टरी आणि मोदी फॅक्टरी, या दोन्ही फॅक्टऱ्या बेईमान घडवण्याच्या, गद्दार घडवण्याच्या दोन्ही फॅक्टऱ्या आता आपल्याला नष्ट करायच्या, खतम करायच्या आहेत, ही कीड आपल्याला नष्ट करायची आहे. या मातीमध्ये पुन्हा एकही गद्दार निर्माण होता कामा नये, शपथ आपण खाल्ली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

मला खात्री आहे ज्या पद्धतीचं वातावरण मला इकडे दिसतंय विदर्भात नागपूरला साहेब उतरले प्रचंड स्वागत झाले. सकाळी तिकडे यवतमाळला प्रचंड प्रचंड मोठा मेळावा आणि स्वागत, आज वाशिमला, इथून आम्ही हिंगोलीत जाणार, परभणी, शिर्डी धाराशीव असं एक-एक जिल्हा आणि किल्ला सर करत आम्ही निघालेलो आहोत, उद्धव ठाकरेसाहेबांच्या नेतृत्वाखाली. असेल हिंमत, या समोर. देखेंगे किसमे कितना है दम. दाऊद सोडून द्या, माझ्यासारखे हजारो राऊत या पक्षामध्ये आहेत जे बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले आहेत. जे उद्धवसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करता आहेत आणि आपण सगळे हजारो लाखो शिवसैनिक आजही निष्ठेने उभे आहात, ही निष्ठाच आपल्या पक्षाला परत एकदा या महाराष्ट्रावर सत्ता आणून दिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक गद्दार गाडल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन संजय राऊत यांनी शिवसैनिकांना केले.

Comments are closed.