Sanjay Raut targeted Amit Shah, reminded of Balasaheb Thackeray and Sharad Pawar help


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे शनिवारी (ता. 17 मे) उद्घाटन होणार आहे. परंतु, त्याआधीच या पुस्तकात लिहिलेले काही मजकूर आता प्रसार माध्यमांच्या हाती लागलेले आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या पुस्तकातील “राजा का संदेश साफ है” या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे शनिवारी (ता. 17 मे) प्रकाशन होणार आहे. परंतु, त्याआधीच या पुस्तकात लिहिलेले काही मजकूर आता प्रसार माध्यमांच्या हाती लागलेले आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या पुस्तकातील “राजा का संदेश साफ है” या प्रकरणाचा खुलासा केला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा यांना कशा प्रकारे वाचवले आहे, याचा खुलासा या पुस्तकाच्या या प्रकरणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर या पुस्तकात ज्या दोन गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत, त्या 100 टक्के खरे असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. (Sanjay Raut targeted Amit Shah, reminded of Balasaheb Thackeray and Sharad Pawar help)

एबीपी माझाने या पुस्तकातील “राजा का संदेश साफ है” या प्रकरणाचा खुलासा करत म्हटले आहे की, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचे सरकार होतं… मोदी विरुद्ध केंद्र असा झगडा सुरू होता… गोधराकांडात सीबीआय अनेक चौकशींचा ससेमीरा लागला होता. या दरम्यान गुजरातचे अनेक पोलीस अधिकारी आणि माजी गृह राज्यमंत्री अमित शहा यांना तुरुंगात जावे लागले होते. चौकशी आणि कारवाईची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत वळली… नरेंद्र मोदी यांना अटक होईल असे वातावरण तेव्हा निर्माण झाले होते. यावेळी त्यांची राजकीय मतभेद असतील पण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं योग्य नाही असे परखड मत शरद पवारांनी एका कॅबिनेटमध्ये व्यक्त केले होते. शरद पवारांच्या या भूमिकेला अनेकांनी मूक संमती दिली होती आणि त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले ? असा सवाल या पुस्तकात राऊत यांच्याकडून विचारण्यात आला आहे. अमित शहा हे एका खून प्रकरणात आरोपी होते… त्यानंतर तडीपारही केले त्यांना जाणून देण्यास सीबीआयचे विशेष पथकाचा विरोध होता… त्या पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते त्यांचा तर शहांना जामीन देण्यास पराकोटीचा विरोध होता. या सगळ्यांमध्ये त्यावेळी मोदी यांनी पवारांना विनंती केली आणि पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली शहा यांना एका प्रकरणात जामीन मिळाला मात्र मग अमित शहा पुढे पवाराने महाराष्ट्राशी कसे वागले? असा प्रश्न पुस्तकाच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : मी अजून लिहिले असते तर हाहाकार माजला असता, नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे धक्कादायक खुलासे

यानंतर या पुस्तकाच्या “राजा का संदेश साफ है” या प्रकरणात बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहांना कसे वाचवले, याचा खुलासा करण्यात आला आहे. संपूर्ण देश तेव्हा मोदींच्या विरोधात होता… परंतु ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभे राहिला. मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली. अमित शहा यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटीबाहेर जाऊन मदत केली. अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते.. केंद्रात यूपीएचे सरकार होते आणि दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांना अमित शहा यांना मदत करता येत नव्हती… अमित शहा गुजरातमधून तडीपार होतेच. सीबीआयने फास आवळल्याने अमित शहा यांच्या तात्पुरत्या जामीनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अडचणीत अडकलेल्या अमित शहा यांना एकच माणूस मदत करू शकतो, ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे शहा यांना कोणीतरी सुचवले. एकेदिवशी भरदुपारी ते लहान असलेल्या जय शहा यांना घेऊन मुंबई विमानतळावर उतरले आणि विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते बांद्राच्या दिशेने निघाले. मात्र मातोश्रीच्या आणि कलानगर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याने कलानगरच्या मुख्य गेटवरच अमित शहा यांना अडवून ठेवण्यात आले. कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती. दुसऱ्या दिवशी अमित शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर आले… यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली आणि अमित शाह हे मातोश्रीवर गेले, असे या पुस्तकात लिहिण्यात आले आहे.

गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण व आपले कुटुंब भोगत असल्याची दर्दभरी रोमांचक कहानी शिवसेनाप्रमुखांना सांगितली . “मी अडचणीत आहे अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे तडीपारी आहे वगैरे..” अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं… त्यानंतर अमित शहा बाळासाहेब यांना म्हणाले. ” आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे… तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत.” त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून अमित शहा यांचे प्रकरण ज्यांच्याकडे होते त्यांच्याशी फोनवरून बोलणे केले. “तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असाल, पण तुम्ही ही हिंदू आहात हे विसरू नका..” बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शहा यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या. त्यामुळे त्यानंतर अमित शहा यांनी पुढे काय केले हे साऱ्या जगाने पाहिले आणि शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी ते निर्घृणपणेचं वागण्याची भावना या पुस्तकातून संजय राऊत यांनी व्यक्त केली.



Source link

Comments are closed.