Sanjay Raut targeted Devendra Fadnavis without naming him at the book release ceremony of Narakatala Swarg


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या आपल्या पुस्तकात त्यांचा राजकारणातील आजवरचा अनुभव जरी मांडलेला असला तरी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात केवळ संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचीच जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, आज ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या आपल्या पुस्तकात त्यांचा राजकारणातील आजवरचा अनुभव जरी मांडलेला असला तरी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात केवळ संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचीच जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, आज (17 मे) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. (Sanjay Raut targeted Devendra Fadnavis without naming him at the book release ceremony of Narakatala Swarg)

संजय राऊत म्हणाले की, हे पुस्तक मी तुरुंगात लिहायच ठरवलं, तेव्हा मी देशमुखांनाही सांगितलं. तिथल्या दरवाजात वाकून जाव-यावं लागतं. तुमचा जगाशी संबंध पूर्ण तुटतो. दगडाच्या भींती बघायच्या आणि दिवस काढायचे असतात. लिहिणं, वाचणं आणि चांगले विचार करायचे असतात. एखादा सुटला तर त्याचे जजमेंट घेऊन मी अभ्यास करायचो. तुरुंगातले लोक बॅरीस्टर बनून बाहेर पडतात. 8 दिवस तुरुंगात राहिला तर पीएचडी करतो, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा – Sanjay Raut : जे लिहिलंय ते सत्य; पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेबांचे नाव घेऊन राऊत काय म्हणाले? 

संजय राऊत म्हणाले की, एकदा आर्थर रोड तुरुंगात उभे होतो. तेव्हा पाहिलं आणि म्हटलं ससे कुठून आले. तर कुंदन शिंदे म्हणाले, ससे नाही, उंदीर आहेत. त्यावर मी म्हटलं, सश्यासारखे उंदीर आणि धिप्पाड आहेच. देशमुखांनी त्यांना नावे ठेवली होती. पण आता त्यांच्याविषयी बोलणं योग्य नाही. कारण ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मर्यादा पाळल्या पाहिजे, कारण त्यातून पुस्तक आलं, असे म्हणत नाव न घेता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा – Uddhav Thackeray : एकवेळ भाजपा देशात राहणार नाही, पण काश्मीर भारतातच राहील; ठाकरेंची खोचक टीका



Source link

Comments are closed.