Sanjay Raut targets Modi govt by giving example of Indira Gandhi


(Pahalgam Terror Attack) मुंबई : काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचे पडसाद उमटले असून सर्वत्र पाकिस्तानवर ठोस कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे उदाहरण देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (Sanjay Raut targets Modi govt by giving example of Indira Gandhi)

वस्तुत:, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्या 24 तासांतच पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे होता. जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो. बलवान तसेच स्वत:ला 56 इंचाची छातीवाले समजणारे अमेरिका, रशिया, इस्रायल सारखी राष्ट्र ताबडतोब प्रतिउत्तर देतात, असा टोला लगावून खासदार संजय राऊत म्हणाले, दुसरीकडे आपण काय केले? तर, पाकिस्तानचे पाणी बंद केले असे सांगितले. पण पाणी अशा पद्धतीने बंद होत नाही. त्यासाठी मोठमोठे बंधारे, धरणे बांधावी लागतील. 20 वर्षांनी हे काम पूर्ण झाल्यावर ते पाणी बंद होईल, असा दावा त्यांनी केला. दुसरे म्हणजे, केंद्र सरकारने पाकिस्तानची 27 युट्यूब चॅनल्स बंद केली, याला काय बदला म्हणतात का, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

हेही वाचा – Raut Vs Mahayuti : …तर, भ्रष्टाचाराला फडणवीसांचे अभय असे मानू, विखे पाटील प्रकरणावरून राऊतांचा निशाणा

गेले चार दिवस संरक्षणमंत्री, सैन्य अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठका, चर्चा सुरू आहेत. पण त्याच्या जोडीला राजकीय इच्छाशक्तीचीही गरज आहे, असे सांगून त्यांनी इंदिरा गांधी यांचे उदाहरण दिले. 1971मध्ये पाकिस्तानवर भारताने हल्ला करण्याचे ठरवले, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनरल माणेकशॉ यांना बोलावून घेतले आणि विचारले की, पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीत, त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचे आहे. तुमची काय तयारी आहे? त्यावर माणेक शॉ यांनी, तयारीसाठी आठ दिवस मागितले. आठ दिवसांनी पाकिस्तानवर हल्ला झाला. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि आपण बदला घेतला. याला म्हणतात, नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती, असे संजय राऊत म्हणाले.

राऊतांकडून अमित शहा लक्ष्य

जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षिततेची जबाबदारी लष्कराबरोबरच गृह मंत्रालयावरही आहे. आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी यांनी पहिली कारवाई गृह खात्यावर केली पाहिजे, असे आमचे मत आहे. आम्ही यावर राजकारण करत नाहीत. आम्ही सरकारच्या पाठीशीच आहोत. पण त्यांच्या चुकांच्या पाठीशी नाहीत. देशाच्या सुरक्षेसंदर्भात सरकार वारंवार चुका करत आहे आणि त्यात पुन्हा राजकारणही करत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – Jal Jeevan Mission : मोदी सरकारच्या प्रत्येक योजना म्हणजे ‘नाव मोठे, लक्षण खोटे’…, ठाकरेंचा हल्लाबोल



Source link

Comments are closed.