Sanjay Raut took Balasaheb Thackeray’s name at the book release ceremony of Narakatala Swarg


मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज (17 मे) प्रकाशन पार पडले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय राऊत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन म्हटले की, जे लिहिलंय ते सत्य आहे. (Sanjay Raut took Balasaheb Thackeray’s name at the book release ceremony of Narakatala Swarg)

संजय राऊत म्हणाले की, जिथे चुकीचं काही होतं, तिथे जावेद अख्तर आवाज उठवत असतात. तसेच शरद पवारांशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही. कारण ते पडद्यामागे आमच्यासाठी लढाया लढत असतात आणि पुढे येऊन देखील लढतात. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासारखे मित्र नेहमी माझ्यासोबत असतात. याशिवाय तृणमूल कॉंग्रेसचे खासदार साकेत गोखले हे महाराष्ट्रातील लढवय्ये आहेत. मी त्यांच्यात माझी प्रतिकृती पाहतो. कारण तेदेखील ईडीमुळे तुरुंगात होते. शरद तांदळे यांनी देखील हिंमतीचे काम केलं आहे. त्यांच्यासाठी ईडीचे दरवाजे उघडे असतील, पण मी ईडीलाचं बुच लावून ठेवलंय. यापुढे कोणाला त्रास होणार नाही. मी शेवटचा माणूस होतो, असे म्हणत संजय राऊत यांनी एकप्रकारे ईडीच्या कारवाईवर खिल्ली उडवली.

हेही वाचा – Sanjay Raut On Devendra Fadnavis : ते आता राज्याचे मुख्यमंत्री; राऊतांनी सांगितली तुरुंगातल्या उंदराची गोष्ट

संजय राऊत म्हणाले की, सध्या माझ्या पुस्तकावर चर्चा सुरू आहे. संपादकीय लिहितो तेव्हा चर्चा होते, त्यामुळे माझ्या पुस्तकाची चर्चा नाही झाली तर उपयोग काय? चर्चा तर झालीच पाहिजे. कारण जे लिहिलंय ते सत्य आहे. माझी ओळख बाळासाहेबांमुळे झाली. सत्य आणि नितीमत्तेची कास सोडू नको, असे त्यांनी मला सांगितले होते. आम्ही वाकणार नाही आणि काही झालं तरी जुलमी शासनव्यवस्थेच्या रणगाड्यासमोर झुकणार नाही, अशी भूमिका राऊथ यांनी स्पष्ट केली.

हेही वाचा – Uddhav Thackeray : एकवेळ भाजपा देशात राहणार नाही, पण काश्मीर भारतातच राहील; ठाकरेंची खोचक टीका



Source link

Comments are closed.