Sanjay Raut welcomed Devendra Fadnavis’ decision
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 1 मार्च) नाशिक येथून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नाशिक : सध्या राज्याच्या राजकारणात महायुतीच्या मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांवरून खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मीक कराडचा हात असल्याचे आता सिद्ध झाले आहे. तर काही वर्षांपूर्वीच्या प्रकरणांमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे दोन वर्षांची शिक्षा न्यायालयानेच सुनावली आहे. त्यामुळे या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत आहेत. त्यामुळे फडणवीसांनी आधी शिंदेंच्या काळातील भ्रष्टाचार बाहेर काढावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut welcomed Devendra Fadnavis’ decision)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 1 मार्च) नाशिक येथून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, शिंदेंच्या काळात जी जी कामे झाली आहेत, ती कामे झाली नसून फक्त भ्रष्टाचार झाला आहे. शिंदेंच्या काळात आरोग्य मंत्री कोण होते? आपल्याला माहीत आहे. त्यामुळे अल्प काळात त्यांचे किती घोटाळे समोर आले, हे ही आपल्याला माहीत आहे. म्हणूनच भाजपाचा त्यांना मंत्री करण्याला विरोध होता, अशी माहिती राऊतांकडून देण्यात आली.
हेही वाचा… Sanjay Raut : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर आमचा दावा नाही तर हक्कच, राऊतांनी स्पष्टच सांगितले
तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे विधान करत खासदार राऊत म्हणाले की, आरोग्य खात्यासारख्या खात्यात, ते ही थेट सार्वजनिक आरोग्य जे जनतेशी संबंधित आहे. यामध्ये गोरगरिब, आदिवासी, दारिद्र्यरेषेखाली लोक यांच्या पैशांच्याबाबतीत असा भ्रष्टाचार होणार असेल तर हे कसले राज्य आहे. त्यामुळे मी आधी पण म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते जे हे सगळं थांबवणार असतील किंवा आधीचा भ्रष्टाचार कसा झाला? हे जनतेसमोर आणणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत. त्यांच्या प्रत्येक कृतीचे आम्ही स्वागत करत आहोत, असे यावेळी खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
Comments are closed.