संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ची तुफान चर्चा; प्रकाशनाच्या आधीच देशाच्या राजकारणात उडवली खळबळ, वाचकांना पुस्तकाची उत्सुकता

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई झाली होती. ED ने अन्याय्य पद्धतीने संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर तीन महिने त्यांना आर्थर रोड तुरुंगात राहावे लागले. संजय राऊत यांनी तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांचे थरारक चित्रण ‘नरकातला स्वर्ग’ (Narkatla Swarg book) या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार असून या पुस्तकातील काही प्रसंग वृत्तवाहिन्यांनी, वेबपोर्टलद्वारे प्रसिद्ध केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.
‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक राऊत यांच्या ED कोठडी आणि आर्थर रोड जेल कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भातील आहे. त्यासोबतच ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. तसेच ‘नरकातला स्वर्ग’ हे नाव कसे सूचले, मराष्ट्रातील बदलते राजकारण, असे वेगवेगळे विषय आज बातम्यांमध्ये चर्चेत राहिले. सोशल मीडियावर देखील ‘नरकातल्या स्वर्ग’ पुस्तकाची चर्चा पाहायला मिळाली. आणखी काही गोष्टी या पुस्तकाच्या निमित्ताने बाहेर येतील यामुळे या पुस्तकाची देशभरात चर्चा असून सगळ्यांना पुस्तक हाती पडण्याची उत्सुकता लागली आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर भूषवणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
“संजय राउतच्या 'नरकटला स्वर्ग' वादळ वादविवाद;
संजय राऊत नवीन पुस्तक, मराठी राजकीय पुस्तके, बुकिंग पॉलिटिकल स्ट्रीम इन इंडिया, प्री-रिलीझ बुक बझ इंडिया, भारतीय राजकारण आणि साहित्य, शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत
Comments are closed.