Sanjay Shirsat accused Matoshree of being harassed by a Bengali father every day
भरत गोगावले अघोरी पूजा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भरत गोगावले यांच्या पूजेवरून शिंदे गटावर टीका केली. याप्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मुंबई : पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी काही व्हिडीओ आणि फोटो शेअर भरत गोगावले यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांच्या आरोपांना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. (Sanjay Shirsat accused Matoshree of being harassed by a Bengali father every day)
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, भरत गोगावले पूजा पाठ करणारे आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला कळाले आहे. कारण अघोरी पूजा अशी कॅमेऱ्यावर होत नाही. ती बंद खोलीत किंवा जंगलात होते. त्यामुळे हे मदारीचे खेळ बंद करावेत आणि मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय? संजय राऊत यांनी सांगावे. यासंदर्भात माध्यमांनी सुद्धा माहिती घ्यावी. कारण मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो. तो यांना सांगतो आज काय करायचं आणि काय नाही. कारण आजकाल उद्धव ठाकरे देखील त्यांचं (संजय राऊत) जास्त ऐकतात. त्यामुळे मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय ते शोधा, असे आवाहन शिरसाट यांनी माध्यमांना केले आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : फडणवीसांना एलिमिनेट करण्यासाठी शिंदे गटाची अघोरी पूजा, राऊतांच्या आरोपाने खळबळ
भविष्यात काहीतरी सकारात्मक घडेल
उद्धव ठाकरेंवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचं ज्वलंत हिंदुत्व घेऊन पुढे जात आहोत. परंतु उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची काँग्रेस केली आहे. त्यांना बाळासाहेबांच्या वक्तव्याचा विसर पडला आहे. परंतु एकनाथ शिंदे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत आणि प्रवेशासाठी तारखा ठरवाव्या लागत आहेत, असा दावा करत संजय शिरसट यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे सध्या राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबत काहीही बोलणार नाहीत. कारण त्यासाठी आवश्यक असलेला संवाद दोघांमध्ये नाही. परंतु हिंदुत्व ही आपली विचारधारा असून एकनाथ शिंदे यापूर्वीच राज ठाकरे यांना भेटले आहेत. त्यामुळे भविष्यात काहीतरी सकारात्मक घडेल अशी आम्हाला आशा असल्याचा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – Bharat Gogawale : त्या आरोपांवर गोगोवले म्हणाले, हे सर्व पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी
Comments are closed.