मद्यधुंद तरुणाचा मध्यरात्री धिंगाणा; मंत्री संजय शिरसाटांना वेगळीच शंका, पत्रकार परिषदेत सांगित
संजय शिझिस: मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर दारू पिऊन एका तरुणाने धिंगाणा घातल्याचा प्रकार रविवारी (20 जुलै ) मध्यरात्री घडला . या तरुणाने दारूच्या नशेत शिवीगाळ, सुरक्षारक्षकांना धमक्या देत दगडफेक करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत हा प्रकार साधा नसून गंभीर हेतूने घडल्याची शंका व्यक्त केली आहे . घरासमोर दारूच्या नशेत आलेल्या तरुणावर हत्या, बनावट नोटा यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे . या तरुणाला कोणी सुपारी दिली की काय असा संशय येतोय असं मंत्री शिरसाट म्हणाले . सौरभ अनिल घुले असे आरोपी तरुणाचे नाव असल्याचे कळते .
संजय शिरसाट काय म्हणाले?
रविवारी रात्री घडलेल्या तरुणाच्या राज्यानंतर मंत्र संजय शिरसाठ यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली . ते म्हणाले,” काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास मी कार्यक्रमावरून घरी आलो, तेंव्हा अचानक लाईट गेली, आणि मी घरच्या आतमध्ये गेलो. थोड्यावेळात एक तरुण घरी आला. पोलिसांनी त्याला काय काम आहे? असे विचारले असता त्याने अरेरावी केली, त्याच्या तोंडातून वास येत होता. पोलिसांनी त्याला गाडीत बसविले. पोलिसांनी मला सांगितले, या तरुणावर संशय येत आहे. तपास करू द्या, माहिती करू द्या, असे मला कळविले.हा तरुण माझ्या मतदार संघातील नव्हता . असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले .
मद्यधुंद तरुणावर अनेक गंभीर आरोप
घराबाहेर येऊन दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाची माहिती घेतली असता त्यावर हत्येचा आरोप, इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने मित्राला सांगितले होते ‘बहोत बडा काम मिला है.. बहोत पैसे मिलेने वाले है… ‘ बनावट नोटा प्रकरणात देखील हा आरोपी असल्याचे कळते. मी ज्याला किरकोळ घटना समजत होतो, ती घटना गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. असे मंत्री शिरसाट म्हणाले .
सौरभ अनिल भोले असे त्या तरुणाचा नाव आहे. सुपारी दिली की काय असा संशय येतोय. घरासमोर येणे म्हणजे त्या व्यक्तीच काहीतरी हेतू आहे. तो पोलिसांनाही धमकी देत होता. जोपर्यंत सत्यता समोर येणार नाही, तोपर्यंत मी कुणावर नाव घेणार नाही. मला अतिरिक्त सुरक्षेची गरज नाही. आहे तेवढी सुरक्षा पुरे आहे.ज्या वेळेस मी घरी आलो त्याच वेळेस लाईट गेली, आणि घरातील सीसीटीव्ही बंद झाले, काही सेकंदात जनरेटर सुरू झाले तेवढ्यात हे सर्व झाले. सीसीटीव्ही पुन्हा सुरू होण्यासाठी दोन ते तीन मिनिटे लागतात. राजकारणात असे प्रकार घडतात, आता यापुढे मी सावध राहील. दरम्यान, कृषीमं सभागृहात कोकाटे रम्मि खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ते काढण्याची कमाल, तसे करणे योग्य नाही, मात्र सर्वांची आपल्याकडे नजर असते मला कळले…असेही मंत्री संजय शिरसाटांनी सांगितलं .
https://www.youtube.com/watch?v=_8iq9hw8ooq
आणखी वाचा
Comments are closed.