Sanjeevraje Naik Nimbalkar will return home to the Nationalist Congress Party


काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील अधिवेशनाला हजेरी लावली होती. यानंतर अजित पवार गटानेही सतीश चव्हाण यांची विधान परिषदेची आमदारकी रद्द करण्यासाठी विधीमंडळाला दिलेले पत्र मागे घेतले होते. यांनतर आता पुन्हा एकदा शरद पवार गटाला धक्का बसणार आहे.

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. विधानसभेनंतर राज्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्व पक्षीय नेतेमंडळींनी आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील अधिवेशनाला हजेरी लावली होती. यानंतर अजित पवार गटानेही सतीश चव्हाण यांची विधान परिषदेची आमदारकी रद्द करण्यासाठी विधीमंडळाला दिलेले पत्र मागे घेतले होते. यांनतर आता पुन्हा एकदा शरद पवार गटाला धक्का बसणार आहे. (Sanjeevraje Naik Nimbalkar will return home to the Nationalist Congress Party)

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जोरदार इन्कमिंग झाले होते. महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांची साथ सोडून अनेक जण शरद पवार यांच्यासोबत आले होते. त्यामध्ये फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचा मुलगा अनिकेतराजे नाईक निबंळकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने संजीवराजे हे फलटण राजकारण संभाळतात. मात्र भाजपाचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना कंटाळून संजीवराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. महत्त्वाचे म्हणजे रामराजे यांच्या पाठींब्यानेच हा प्रवेश झाला होता. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं होतं. मात्र आता संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा अजित पवार गटात घरवापसी करणार असल्याचे समजते.

हेही वाचा – Arjun Khotkar : राजकीय भूकंप काय असतो हे दाखवून देऊ, अर्जुन खोतकरांचा रोख कोणाकडे?

संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र त्यांना उमेदवारीसाठी संधी न देता शरद पवार गटाने दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. तर फलटण-कोरेगावच्या जागेवर भाजपाने दावा केला होता. यासाठी भाजपाने महायुतीत या जागेची मागणी केली होती. पण या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याने त्यांनीही दावा केला होता. अखेर फलटण-कोरेगावची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आणि सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी मिळाली. परंतु विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण यांचा पराभव झाल्यामुळे संजीवराजे नाईक निंबाळकर हे नाराज होते. त्यामुळे पुन्हा एकदा ते अजित पवार गटात येणार असल्याची चर्चा आहे.

आदिती तटकरे यांचे महत्त्वाचे विधान

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरवापसीवर महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, संजीवराजे नाईक निंबाळकर हे यापूर्वी अजित पवारांना भेटून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरवापसीचा निर्णय लवकरच घेतला जाईल. कांद्यापासून बांद्यापर्यंत इनकमिंग होईल, असा विश्वासही आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Jitendra Awhad : धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, आव्हाडांची खोचक टीका



Source link

Comments are closed.